3 May 2024 6:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Investment Tips | या योजनेतून तुम्ही कमवू शकता भरघोस परतावा, गुंतवणूक केल्यास दरमहा 50 हजार रुपये मिळतील

Investment tips

Investment Tips | जर तुम्ही खाजगी नोकरी किंवा छोटा उद्योग करत असाल आणि तुम्हाला निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा हवी असेल तर भारत सरकारची राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) तुमच्यासाठी गुंतवणुकीचा एक योग्य पर्याय असू शकते. या पेन्शन योजनेत तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर मासिक एक ठराविक रक्कम दिली जाईल. आणि योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर सवलातीचाही फायदा मिळेल. योग्य योजनेत पैसे गुंतवणूक केले तर, तुम्ही दरमहा 50 हजार रुपयांपर्यंतच्या पेन्शन सहज मिळवू शकता.

दर महिन्याला ठराविक पेन्शन मिळवण्यासाठी या योजनेत दीर्घकालीन गुंतवणूक करणे जबरदस्त पर्याय मानले जाते. तुम्ही नोकरी करत असताना तुमच्या पगाराची थोडीफार रक्कम बचत करून गुंतवणूक करता जेणेकरून तुम्हाला निवृत्तीनंतर ठराविक रक्कम पेन्शन म्हणून मिळत राहतील. तुम्हाला या योजनेत गुंतवणुकीवर दोन प्रकारे परतावा मिळतो. एक म्हणजे मर्यादित पैसे, जे एकाच वेळी तुम्ही काढू शकता.आणि दुसरे म्हणजे जे तुम्हाला दर महिन्याला पेन्शनसारखे दिले जातील. तुम्ही या योजनेत जितके जास्त पैसे गुंतवणूक कराल, तितके जास्त पैसे तुम्हाला निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून मिळतील.

50000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल?
सर्वात आधी तुम्हाला NPS बद्दल सर्व माहिती जाणून घेणे खूप गरजेचे आहे. NPS योजनेत दोन प्रकारची खाती उघडून गुंतवणूक केली जातात. पहिला प्रकारचे गुंतवणूक खाते टियर-1 म्हणून ओळखला जातात. आणि दुसरा प्रकारचे गुंतवणूक खाते टियर-2 म्हणून ओळखला जातात. टियर-1 गुंतवणूक खाते अशा लोकांसाठी आहे ज्यांचे कोणतेही पीएफ खाते किंवा गुंतवणूक नाही. NPS टियर 1 गुंतवणूक खाते निवृत्तीसाठी तयार करण्यात आलेली योजना आहे. तुम्ही या योजनेत किमान 500 रुपये जमा करून गुंतवणूक करू शकता. निवृत्तीनंतर, तुम्ही 60 टक्के पैसे एकरकमी काढू शकता. आणि 40 टक्के रक्कम तुम्हाला मासिक पेन्शन म्हणून दिली जाईल.

NPS योजनेत गुंतवणूक केल्यास आपल्याला कर सवलतही दिली जाईल. टियर-1 गुंतवणूक खात्यातील योगदान आणि पैसे काढणे या दोन्हीवर योजना धारकला कर सवलतीचा लाभ उपलब्ध करून दिला जातो. या योजनेतमध्ये आयकर कायदा कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत आणि कलम 80CCD (1B) अंतर्गत तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंतच्या कर सवलतीचा लाभ उपलब्ध करून दिला जाईल. NPS टियर-1 गुंतवणूक खात्यातून काढलेली एकरकमी गुंतवणूक रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे.

अॅन्युइटीमधून मिळणारे उत्पन्न आयकर कायद्या अंतर्गत कर पात्र असेल. तुमच्या इतर सर्व कमाईमध्ये हे उत्पन्न जोडून, ​​तुमचा आयकर स्लॅब निश्चित केला जाईल, आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या उत्पन्नावर आयकर भरावा लागेल. यासाठी तुम्हाला पेन्शन व्यवस्थापन करावे लागेल. समजा तुम्ही निवृत्तीनंतर तुमच्या NPS खात्यातून 60 टक्के पैसे एकरकमी काढली आहे आणि उर्वरित 40 टक्के रक्कम तशीच ठेऊन तुम्ही गुंतवणूक सुरू ठेवली, तर अशा परिस्थितीत तुम्हाला दरमहा 50 हजार रुपये पेन्शन पाहिजे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे अडीच कोटी रुपये गुंतवणूक निधी असणे आवश्यक आहे. हे केल्यावर तुम्ही निवृत्तीनंतर 1.5 कोटी रुपये एकरकमी कधी शकता आणि उरलेल्या 1 कोटी रुपयांची तुम्हाला मासिक पेन्शन सुरू होईल. जर तुमचा वार्षिक अॅन्युइटी दर 6 टक्के असेल, तर या स्थितीत तुम्हाला दरमहा 50 हजार रुपये पेन्शन सहज मिळू शकेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment tips on NPS scheme for monthly pension benefits on 11 September 2022.

हॅशटॅग्स

#Investment Tips(142)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x