27 April 2024 6:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

IPO Investment | अन्नपूर्णा डेलिशियस कंपनीचा IPO लाँच, शेअरची किंमत 68 ते 70 रुपयांच्या दरम्यान, दिग्गज गुंतवणूकदाराने केली गुंतवणूक

IPO Investment

IPO Investment | 15 सप्टेंबर 2022 रोजी अन्नपूर्णा डेलिशियस लिमिटेडचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आणि 19 सप्टेंबर 2022 पर्यंत हा IPO गुंतवणुकीसाठी खुला ठेवला जाईल. अन्नपूर्णा डेलिशियस कंपनीच्या IPO मध्ये एका शेअरची किंमत 68 ते 70 रुपयेच्या दरम्यान असेल.

IPO ची तारीख घोषित :
बऱ्याच काळाच्या प्रतीक्षेनंतर गुंतवणूकदारांना शेअर बाजारात गुंतवणुकीची नवीन संधी मिळणार आहे. कारण आणखी एका कंपनीचा IPO बाजारात गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा IPO आहे “अन्नपूर्णा डेलिशियस लिमिटेड” कंपनीचा. 15 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला असून 19 सप्टेंबर 2022 पर्यंत आपण त्यात पैसे लावू शकता. अन्नपूर्णा डेलिशियस कंपनीच्या IPO मध्ये एका शेअरची किंमत 68 ते 70 रुपये दरम्यान ठरवण्यात आली आहे. एनएसई निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, 15 सप्टेंबर 2022 रोजी IPO इश्यूच्या पहिल्याच दिवशी रात्री 11.30 वाजेपर्यंत अन्नपूर्णा IPO 0.73 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी ह्या कंपनीत खूप मोठी गुंतवणूक केली आहे.

शंकर शर्मा यांची गुंतवणूक :
भारतील प्रसिद्ध गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी अन्नपूर्णा कंपनीमध्ये 1 लाखांहून अधिक शेअर्स खरेदी करून खूप मोठी गुंतवणूक केली आहे. कंपनीच्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स नुसार, प्रसिद्ध गुंतवणूकदार शंकर शर्मा यांच्याकडे अन्नपूर्णा डेलिशियस कंपनीचे 1,25,000 शेअर्स आहेत. हा वाटा कंपनीच्या एकूण पेड अप कॅपिटलच्या सुमारे 1.03 टक्के आहे. कंपनीच्या संचालकाकडे अन्नपूर्णा डेलिशियस लिमिटेडची एकूण 61.57 टक्के मालकी आहे. शेअरहोल्डींग चार्ट नुसार श्रीराम बागला यांची कंपनीत 8.26 टक्के गुंतवणूक आहे. 27 सप्टेंबर 2022 रोजी अन्नपूर्णा कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE निर्देशांकाच्या SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होतील.

कंपनीबद्दल सविस्तर :
दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही गुंतवणुकीची एक चांगली संधी आहे. अन्नपूर्णा डेलिशियस लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदारांकडून 8.6 कोटी रुपये उभारले आहे. कंपनी IPO इश्यूद्वारे 43.22 लाख इक्विटी शेअर्स ऑफर करून पैसे जमा करणार आहे. अन्नपूर्णा डेलिशिअस कंपनी स्वतःच्या ‘अन्नपूर्णा’ ब्रँड अंतर्गत खाद्य स्नॅक्स आणि चमचमीत खाद्यपदार्थ तयार करते आणि त्याचे विक्री आणि विपणन ही करते. कंपनीचे सुमारे संपूर्ण भारतात 300 वितरक आणि 80 पेक्षा अधिक सुपर मार्केट वितरकांचे जाळे पसरले आहे. ब्रोकरेज फर्म प्रॉफिटमार्टने एका प्रेस नोटमध्ये विधान केले आहे की, “आम्ही अन्नपूर्णा डिलिशियस कंपनीच्या IPO बाबत दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी सकारात्मक आहोत. कारण भारतातील FMCG बाजारपेठ गुंतवणुकीसाठी एक फायदेशीर क्षेत्र मानले जाते. पुढील 3-5 वर्षांमध्ये त्यातील गुंतवणूक आणि उत्पादन दुप्पट होणार आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. “अन्नपूर्णा डेलीशिअसची शेअर बाजारात कामगिरी सातत्यपूर्ण तेजीत राहील, असा विश्वास ब्रोकरेज हाऊसने व्यक्त केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IPO Investment of Annapurna enterprises has opened for investment on 16 September 2022.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)annapurna(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x