5 May 2024 10:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Agent Portability Option | तुमचा इन्शुरन्स एजंट चांगली आणि वेळेवर सर्व्हिस देत नाही?, मग आता तुमचा इन्शुरन्स एजंट सुद्धा बदलू शकता

Agent Portability Option

Agent Portability Option | भारतात लवकरच सर्व विमाधारकाना विमा पॉलिसीमध्ये एजंट पोर्टेबिलिटीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच IRDAI ही इन्शुरन्स क्षेत्राचे नियमन करणारी एक नोडल संस्था आहे. IRDAI ने निर्णय घेतला आहे की जर एखादा विमाधारक त्याच्या एजंटच्या सर्व्हिस वर नाराज असेल, किंवा असंतुष्ट असेल तर व्यक्ती आपला इन्शुरन्स एजंट बदलू शकतो. IRDA च्या या प्रस्तावात, सामान्य विम्यामध्ये एजंट बदलण्याचा पर्याय उपलब्ध नसेल, पण 20 वर्षांपेक्षा जुन्या जीवन विमा पॉलिसीमध्ये हा पर्याय देण्यात आला आहे.

देशात लवकरच, विमाधारकांना इन्शुरन्स पॉलिसीमध्ये एजंट पोर्टेबिलिटी पर्यायाचा दिला जाणार आहे. या नवीन नियमानुसार विद्यमान एजंटला तुमच्या इन्शुरन्स प्रीमियमवर मिळणारे कमिशन पोर्टेबिलिटीनंतर नवीन एजंटला दिले जाईल. आतापर्यंत देशात असा पर्याय उपलब्ध नव्हता. यामुळे आता एलआयसीसह अनेक विमा कंपनीच्या पॉलिसी घेणाऱ्या करोडो ग्राहकांना दुसरा पर्याय निवडता येणार आहे.

महत्वाची लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे, विमा घेतल्यानंतर काही लोक एजंटच्या वाईट वागणुकीमुळे किंवा इतर कोणत्याही फसवणुकीच्या कारणांमुळे संतुष्ट नसतात. अशा परिस्थितीत आता तुम्ही तुमचा इन्शुरन्स एजंट सहज बदलू शकता. देशातील बहुतेक लोक विमा पॉलिसीसाठी विमा एजंटवर अवलंबून असतात आणि एजंट त्याच्या फायद्यासाठी लोकांना येन केन प्रकारे पॉलिसी विकत असतो. कधी कधी विमाधारकाना पॉलिसी घेतल्यावर फसवणूक झाल्याचे समजते. अशा परिस्थितीत एजंट आणि विमाधारक यांच्यात नेहमीच वाद होताना आपणही पाहिजे असेल.

नवीन नियम आणि सुविधा :
आता काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार, सोयीनुसार तुमचा विमा एजंट बदलू शकता. देशातील प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न आणि गरजा वेगवेगळ्या असतात, ह्याच गोष्टीचा विचार करून विमा कंपनी लोकांच्या गरजेनुसार वेगवेगळी विमा पॉलिसी तयार करत असतात. परंतु हे इन्शुरन्स एजंट लोकांच्या गरजा आणि उत्पन्न लक्षात घेऊन स्वतः त्यातून फायदे मिळवण्याच्या उद्देशाने लोकांना चुकीची पॉलिसी देतात. अशा परिस्थितीत, IRDA ने विमाधारकाला नवीन पर्याय दिला आहे की, तुम्ही तुमचा इन्शुरन्स एजंट सहज बदलू शकता.

विमाधारकांसाठी फायद्याचा नियम :
काही महिन्यापासून IRDA एकापाठोपाठ एक मोठे निर्णय जाहीर करून इन्शुरन्स च्या सेवा घेणे सुरळीत करत आहे. अलीकडेच, IRDA ने विमा कंपन्यांना स्वतःहून रुग्णालये पॅनेल तयार करण्याची परवानगी दिली होती. रुग्णांच्या कॅशलेस सुविधेसाठी नियम शिथिल करण्याच्या उद्देशाने IRDA ने रुग्णालये पॅनेल तयार करण्याची परवानगी दिली होती. या निर्णयामुळे आता अधिकाधिक रुग्ण कॅशलेस उपचाराची सुविधा घेऊ शकतात. या अंतर्गत आयआरडीएने विमा कंपन्यांना बोर्ड स्तरावर पॉलिसी बनवण्यास सांगितले होते, त्यानुसार विमा कंपनी कोणत्याही रुग्णालयाला पॅनेलमध्ये आणू शकते.

बंधनकारक नियम हटवले :
IRDA ने पूर्वी विमा कंपनीला आपले कोणतेही विमा इन्शुरन्स ऑफर करण्यापूर्वी परवानगी घेणे बंधनकारक केले होते, आता हे नियम बदलले आहेत. पूर्वी विमा कंपनीला कोणतेही इन्शुरन्स सादर करण्यापूर्वी, IRDA कडून पूर्व-मंजुरी घेणे बंधनकारक होते. परंतु आता IRDA ने नियम बदलल्यानंतर, आरोग्य आणि जवळजवळ सर्व सामान्य विमा इन्शुरन्स कंपनीला नवीन इन्शुरन्स लाँच करण्यापूर्वी IRDAI नियामकाकडून परवानगी घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Agent Portability Option option has been launched by IRDAI to Change insurance agent anytime on 18 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x