27 April 2024 12:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Zomato Share Price | झोमॅटो शेअरच्या गुंतवणूकदारांची धाकधूक थांबेना, थेट 60 रुपयांवर आला, पुढे काय होणार जाणून घ्या

Zomato Share price

Zomato Share Price| प्रसिद्ध ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचे गुंतवणूकदार मागील काही दिवसांपासून मोठ्या नुकसानीला तोंड देत आहेत. लोकांनी आपली बरीच गुंतवणूक ह्या स्टॉकमध्ये गमावली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Zomato चे शेअर्स 3.95 टक्के पडले होते आणि 60.80 रुपये ट्रेडिंग प्राईसवर बंद झाले होते. मागील एका महिन्यात Zomato च्या स्टॉकमध्ये 24.57 टक्केची पडझड झाली आहे. चालू वर्ष 2022 मध्ये आतापर्यंत Zomato चा स्टॉक 57 टक्के पर्यंत पडला आहे. मागील वर्षी 2021 मध्येच Zomato चे इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO खुला करण्यात आला होता. ज्या गुंतवणूकदारांना IPO मध्ये शेअर्सचे वितरण झाले होते, त्यांनी फक्त कंपनीच्या लिस्टिंगच्या दिवशीच चांगला नफा कमावला होता. जे लोक त्या दिवशी स्टॉक विकून बाहेर पडले, त्यांची गुंतवणूक वाचली. ज्यांनी जास्त नफा कमावण्यासाठी शेअर होल्ड केला, त्यांना भयंकर नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

गुंतवणूकदारांचे पैसे गेले :
Zomato च्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 169.10 रुपये होती, जी zomato ने फक्त एकदाच स्पर्श केली होती. मात्र, त्यानंतर Zomato चा स्टॉक आपल्या लोगोच्या लाल रंगासारखाच लाल निषणीवर ट्रेड करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 2022 मध्ये Zomato कंपनीचे शेअर्स 141.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 9 महिन्यांत zomato च्या शेअरमध्ये 57 टक्केची जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. अश्या मजबूत पडझडीसह Zomato चा स्टॉक 60.80 रुपयांवर आला होता, आता त्यातहीमागील आठवड्यापासून घसरण सुरू झाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी ह्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयेची गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य सध्या 43 हजार रुपयांवर आले आहे.

विक्रीचा जबरदस्त दबाव : IPO मध्ये गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार आता शेअर्स विकून कंपनीतून बाहेर पडत आहेत. अनेक दिग्गज गुंतवणूकदारांनीही आपली गुंतवणूक लॉस मध्ये विकून ते आता झोमॅटोमधून बाहेर पडत आहेत. अलीकडेच सुरुवातीच्या गुंतवणूकदारांपैकी एक Sequoia Capital India ने Zomato कंपनीचे 2 टक्के शेअर्स खुल्या बाजारात विकले आहेत. BSE च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध देता नुसार Sequoia capital India कडे सध्या Zomato ची 4.4 टक्के मालकी आहे. याशिवाय उबरने आपल्या गुंतवणुकीचा वाटा हझोमॅटोला विकला आहे. मात्र,काही म्युच्युअल फंडांनी Zomato मध्ये गुंतवणूक वाढवली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Zomato Share price has Fallen down after huge selling pressure in 26 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x