3 May 2024 8:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Stock In Focus | या शेअरने 1 महिन्यात 45 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होणार, स्टॉक नेम लक्षात ठेवा

Stock In Focus

Stock In Focus | शेअर बाजारात सध्या बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट, आणि लाभांश अशा अनेक घोषणा दररोज पाहायला मिळत आहेत. आणि आता शेअर बाजारात गुंतवणूक आणि ट्रेडिंग करणाऱ्या लोकांसाठी एक जबरदस्त बातमी आली आहे. अंजनी फूड्स कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे, आणि रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. अंजनी फुड्स कंपनीने आपले शेअर्स 5:1 या प्रमाणात विभाजित करण्याचे जाहीर केले आहे. चला तर मग जाणून घेऊ कंपनीची कामगिरी सविस्तर

BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार,21 ऑक्टोबर 2022 ही अंजनी फूड्स कंपनीच्या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख असेल, असे संचालक मंडळाने जाहीर केले आहे. संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आपले शेअर्स 5:1 या प्रमाणात विभाजित करण्याचे जाहीर केले होते. या स्टॉक स्प्लिटनंतर कंपनीच्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरची किंमत 2 रुपये पर्यंत खाली येईल.

कंपनीच्या शेअर्सचे प्रदर्शन :
चालू वर्ष 2022 मध्ये अंजनी फूड्स कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव मोठ्या प्रमाणत दिसून आला होता. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये 5.98 टक्क्यांची पडझड झाली असून किंमत 171.50 रुपयेवर आली आहे. त्याच वेळी,गेल्या 6 महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती, आणि शेअर्स होल्ड केले होते, त्यांनी आतापर्यंत 43.51 टक्के नफा कमावला आहे. मागील एका महिनाभरापासून या कंपनीचे शेअर्स अप्रतिम तेजीत धावत आहेत. मागील एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 44.85 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 202.95 रुपये होती.

5 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती, त्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत अंदाजे 700 टक्के नफा मिळाला असणार. या कालावधीत कंपनीचा शेअर 21 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन स्टॉक सध्या 171.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीचे शेअर्स खरेदी करणारे लोक सध्या भरघोस कमाई करत आहेत, आणि स्टॉक पडला असला तरीही ते लोक प्रॉफिटमध्ये आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Anjani Foods limited Stock In Focus of share market expert for Amazing returns on investment 10 October 2022.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x