18 May 2024 4:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा?
x

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 16 लाख रुपयांचा परतावा मिळेल, कसे वाढतात पैसे समजून घ्या

Post Office Scheme

Post Office Scheme | सध्याच्या काळात महागाई, कमी उत्पन्न आणि वाढते व्याज दर यामुळे मध्यम वर्गीय लोकं वैतागले आहेत. अशा महागाईच्या काळात तुटपुंज्या पगारातून खर्च भागवून बचत करणे आणि गुंतवणूक करणे हा विचार देखील मध्यम वर्गीय लोकांना परवडत नाही. शेअर बाजारात गुंतवणूकीची जोखीम, आणि इतर गुंतवणूक योजनेबद्दल अज्ञान या मध्यमवर्गीय लोकांच्या सर्वात मोठया समस्या आहेत.

बरेच लोक आपले खर्च कमी करून बचत करतात, आणि कोणत्यातरी लहान गुंतवणूक योजनेत पैसे लावून परतावा कमावतात, हा परतावा देखील नगण्य असतो. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका योजनेबद्दल माहिती देणार आहोत, जी तुम्हाला अप्रतिम नफा कमावून देऊ शकते.

जर तुम्ही हमखास आणि सुरक्षित परतावा कमावून देणारी गुंतवणूक योजना शोधत असाल तर पोस्ट ऑफीसची आवर्ती ठेव योजना तुमच्यासाठी फायदेशीर राहील. पोस्ट ऑफीसची आवर्ती ठेव योजना गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सुरक्षित आणि हमखास परतावा कमावून देणारी आहे. पोस्ट ऑफीसच्या आवर्ती ठेव योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशष्ट्य म्हणजे या फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. या योजनेत सर्व आर्थिक वर्गातील लोक गुंतवणूक करून परतावा कमवू शकतात.

योजनेचा मॅच्युरिटी कालावधी :
या योजनेत तुम्हाला एक खास सुविधा देण्यात आली आहे. तुम्ही तुमच्या गुंतवणूक क्षमतेनुसार मॅच्युरिटी कालावधी निवडू शकता. या योजनेंतर्गत जमा केलेल्या पैशावर पोस्ट ऑफिस दर तीन महिन्यांनी व्याज परतावा देते. तुम्ही जेवढा जास्त काळ या योजनेत गुंतवणूक करत राहाल, तेवढा जास्त काळ तुम्हाला दर तिमहीला व्याज परतावा मिळत राहील.

वय मर्यादा :
ऑफीसच्या आवर्ती ठेव योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय 18 असावे लागते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमाल वय मर्यादा नाही. पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावाने खाते उघडून गुंतवणूक करू शकतात.

कर्ज सुविधा :
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही कर्ज देखील मिळवू शकता. कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या पोस्ट ऑफिसच्या शाखेत अर्ज करावा लागेल. तुम्ही हे कर्ज 12 हप्त्यांमध्ये परतफेड करू शकता. तुम्ही तुमच्या खात्यात जमा केलल्या एकूण गुंतवणूक रकमेपैकी 50 टक्के रक्कम कर्जस्वरूपात घेऊ शकता.

16 लाख रुपये परतावा कसा मिळतो?
जर तुम्ही पोस्ट ऑफीसच्या आवर्ती ठेव योजनेत दर महिन्याला 10,000 रुपये जमा केले तर 10 वर्षांनंतर तुम्हाला व्याज परतावा जोडून 16 लाखांपेक्षा अधिक रक्कम मिळेल. समजा तुम्ही दर महिन्याला पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजनेत 10,000 रुपये जमा केले, तर एका वर्षात तुमची गुंतवणूक रक्कम 1 लाख 20 हजार रुपये होईल. जर तुम्ही 10 वर्षांसाठी नियमित गुंतवणूक केली तुमची गुंतवणूक रक्कम 12 लाख रुपये असेल. योजनेच्या मॅच्युरिटीनंतर तुम्हाला परतावा म्हणून 4,26,476 रुपये व्याज दिला जाईल. अशा प्रकारे तुम्हाला 10 वर्षांनंतर एकूण 16,26,476 रुपये मिळतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post office Recurring deposit scheme for high rate of interest and returns on 15 October 2022.

हॅशटॅग्स

Post office Scheme(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x