29 April 2024 4:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
x

LIC Policy Surrender | पॉलिसी सरेंडर केल्यावर किती पैसे परत मिळतात आणि किती नुकसान होते, जाणून घ्या सविस्तर

LIC Policy Surrender

LIC Policy Surrender | कोरोना महामारीने अनेकांवर आर्थिक संकट आले. या काळात नोक-या गेल्याने अनेकांनी आपली एफडी मोडली तर काहींनी एलआयसी पॉलिसी सरेंडर केली. एका अहवालानुसार पॉलिसी सरेंडर करण्याचे प्रमाण साल २०२०-२१ मध्ये पूर्वी पेक्षा दुप्पट झाले आहे. त्यामुळे तुम्ही देखील पॉलिसी सरेंडर करण्याचा निर्णय घेत असाल तर त्याचे नियम आणि अटी काय आहेत हे आधी जाणून घ्या.

एलआयसी पॉलिसी सरेंडर करण्याच्या काही अटी आहेत. पहिले म्हणजे तीन वर्षांच्या आत तुम्ही सरेंडर करत असाल तर तुम्हाला पैसे परत दिले जात नाही. यासाठी तीन वर्षांचा कालावधी दिला पाहीजे. तीन वर्षांनंतरच तुम्ही पॉलिसी सरेंडर करू शकता.

सरेंडर मूल्य किती मिळते
पॉलिसी सरेंडर केल्यावर तुम्हाला सरेंडरचे मुल्य दिले जाते. जेव्हा मध्यभागी असताना तुम्ही पॉलिसी सरेंडर करण्याचा निर्णय घेता तेव्हा तुम्हाला त्याच्या मुल्याइतकी रक्कम दिली जाते. यालाच पॉलिसी व्हॅल्यू म्हणतात. हे सरेंटर मूल्य मिळवण्यालाठी तुम्हाला आधी तीन वर्ष यात सक्रीय असणे गरजेचे आहे.

किती पैसे परत केले जातात
जर तुम्ही नियमितपणे ३ वर्षे हप्ते भरत आहात तरच यासाठी तुम्ही पात्र ठरता. यात तुमचे मोठे नुकसान होते. यात तुमच्या प्रिमीअमच्या ३० टक्के रक्कम दिली जाते. म्हणजे तुम्ही पहिल्या वर्षी भरलेल्या रकमेतले सर्व पैसे वाया जातात. तसेच बाकीच्या दोन वर्षांतील प्रीमिअमची ३० टक्के रक्कम मिळते. यात एलआयच्या कोणत्याही सवलती दिल्या जात नाही. पॉलिसी स्विकारताना दिलेल्य ऑफर रद्द केल्य जातात.

कोणती कागदपत्रे आवश्यक
ही पॉलिसी सरेंडर करताना तुमच्याकडे एलआयसी सरेंडर आणि NEFT फॉर्म असायला हवा. तसेच पॉलिसीची सर्व कागदपत्रे आणि पॅन कार्डची झेरॉक्स जोडावी. हॅंड राइटींगमधील पत्रात तुमचे पॉलिसी सरेंडर करण्याचे कारण असावे. तसेच मुळ पॉलिसी बॉंड, फॉर्म नंबर 5074, बॅंकेतील खात्याचा तपशील ही सर्व कागदपत्रे सादर करावी लागतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : LIC Policy Surrender How much money is recovered and what is the loss on policy surrender 02 April 2023.

हॅशटॅग्स

#LIC Policy Surrender(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x