2 May 2024 3:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

Penny Stock | स्टॉक मार्केट का छोटा रिचार्ज, या 5 रुपयांच्या शेअरने 2500 टक्के परतावा दिला, स्टॉकचे नाव सेव्ह करा

Penny stock

Penny Stock | रामा स्टील ट्यूब्स या लोखंड आणि पोलाद वस्तू बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सची किंमत गगनाला भिडली आहे. या कंपनीच्या शेअरने यावर्षी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सनी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटवर 172.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 42.72 रुपये होती. रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स काही महिन्यापूर्वी 1:5 ता प्रमाणात विभाजित करण्यात आले होते.

शेअर ने दिलेला परतावा :
Rama Steel Tubes कंपनीच्या शेअर्सनी एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 140 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. 2022 या वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी 2022 रोजी Rama Steel Tubes कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 71.21 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 14 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 172.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 158 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी, मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 42 टक्के वधारली आहे.

1 लाखावर दिला 33 लाखांहून अधिक परतावा :
रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सनी मागील अडीच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 2500 टक्क्यांहून अधिक वाढवले आहेत. 31 जुलै 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE निर्देशांकावर 5.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 14 नोव्हेंबर 2022 रोजी रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 172.25 रुपयांवर पोहोचले आहेत. जर तुम्ही 31 जुलै 2020 रोजी रामा स्टील ट्यूब्सच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक आतपर्यंत होल्ड करून ठेवली असती तर तुमच्या गुंतवणूकीचे मूल्य आता 33.57 लाख रुपये झाले असते. रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना मागील एका वर्षात 230 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny stock of Rama Steel Tubes share price return on investment on 15 November 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x