28 April 2024 4:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल
x

Stock To Buy | बाब्बो! हे शेअर्स अल्पावधीत तुमचे पैसे वाढवतील, शेअर्सची लिस्ट सेव्ह करा

Stocks to buy

Stock To Buy | शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड सुरू झाला असून पुढील एका महिन्याच्या कालावधीत तुम्ही शेअर बाजारातून अमाप पैसे कमवू शकता. सध्या भारतात लग्नाचा सीजन सुरू झाला आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे जिथे विवाह उद्योगाची बाजारपेठ सर्वात मोठी आहे. आपल्या देशात दरवर्षी सुमारे 10 दशलक्ष पेक्षा अधिक विवाह होतात, आणि याद्वारे देशात 50 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक मोठ्या रकमेचा व्यवसाय केला जातो.

देवोत्थान एकादशी ते 13 डिसेंबर 2022 पर्यंत देशात सुमारे 25 लाख विवाह नवीन विवाह होणे अपेक्षित आहे. सीएआयटीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार भारतात लग्नाच्या सीजनमध्ये सुमारे 3 लाख कोटी रुपयांची लग्न खरेदी होते. विवाह उद्योग क्षेत्रात आदरातिथ्य संबधित वस्तू, नवीन कपडे, दागिने आणि प्रवासी सेवा यांचा समावेश होतो. अशा स्थितीत लग्नाचे सीजन सुरू असताना या क्षेत्रांशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे लावणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते, अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. केडिया कमोडिटीज फर्मनी आपल्यासाठी असे चार स्टॉक निवडले आहेत, जे या लग्नाच्या सीजन मध्ये तुम्हाला बंपर परतावा देऊ शकतात. चला तर मग जाणून या स्टॉकची लिस्ट आणि सविस्तर माहिती.

Ease My Trip :
Ease My Trip कंपनीचा शेअर आज सुमारे अडीच टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. आज सुरुवातीच्या काही तासात हा स्टॉक 413.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. स्टॉक मार्केट मधील चार पैकी दोन तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे, तर एकाने प्रॉफिट बुक करण्याचा सल्ला दिला आहे. आणि एका तज्ञांने स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. केडिया फर्मच्या तज्ञांनी हा स्टॉक 480 रुपयांच्या टार्गेट किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. Ease My Trip कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 476.50 रुपये आहे, तर या स्टॉकची नीचांक किंमत पातळी 239 रुपये होती.

Indian Hotels :
पर्यटन उद्योगाशी संबंधित दुसरा स्टॉक म्हणजे IHCL म्हणजेच टाटा समूहाची कंपनी “इंडियन हॉटेल्स लिमिटेड”. आज या स्टॉकमध्ये थोडी पडझड पाहायला मिळाली होती. मात्र 13 पैकी 8 स्टॉक मार्केट विश्लेषक या स्टॉकबद्दल सकारात्मक आहेत. त्यांनी स्टॉक बाय रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 3 तज्ञ असे आहेत ज्यांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. त्याच वेळी, एका तज्ञांने स्टॉक विकून प्रॉफिट बुक करण्याचा सल्ला दिला आहे. केडिया फर्मच्या जाहीर अहवालानुसार इंडियन हॉटेल्स कंपनीचा स्टॉक 435 रुपये या लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करावा. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात हा स्टॉक 314.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी किंमत 349 आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीच्या स्टॉकची नीचांक किंमत पातळी 171 रुपये होती.

Raymond :
रेमंड कंपनी प्रिमियम कपड्यांचा ब्रँड म्हणून भारतात प्रसिद्ध आहे. तज्ञांनी रेमंड कंपनीच्या शेअर्सवर सकारात्मक मत व्यक्त केले असून स्टॉक खरेदी करण्यास अनुकूल असल्याचे म्हंटले आहे. हा स्टॉक गुंतवणूकदारांनी 1500 रुपयेच्या लक्ष्य किंमतीसाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडावा असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. आज ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात रेमंड कंपनीचे शेअर्स 3.25 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज NSE निर्देशांकावर हा स्टॉक 1246.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

Kalyan Jewellers :
आता आपण पाहूया दागिन्यांशी संबंधित कंपनीच्या शेअरची माहिती. लग्नात आपण दागिन्यांची मोठी खरेदी करतो. अशा परिस्थितीत कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड या कंपनीचा स्टॉक तुम्हाला मजबूत परतावा कमावून देऊ शकतो. शेअरवर थोडीफार विक्रीचा दबाव दिसून येत आहे. मात्र स्टॉक मार्केट विश्लेषकांनी शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर सध्या 103.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. स्टॉक मार्केट मधील सात विश्लेषकांनी हा स्टॉक बाय रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 140 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह स्टॉक खरेदी केल्यास तुम्हाला काही दिवसांत ते 36 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of Stocks to buy in wedding season to earn huge returns on 15 November 2022

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(279)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x