27 April 2024 10:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Credit Card Benefits | क्रेडिट कार्डचे हे फायदे माहीत आहेत? क्रेडिट कार्डचे हे फायदे वाचून चक्रावून जाल

Credit card Benifits

Credit Card Benefits | क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही झटपट क्रेडिट आधारित व्यवहार पूर्ण करू शकता. गरजेच्या वेळी तुम्हाला पैसे किंवा कर्ज मदत उपलब्ध करून देणारे क्रेडिट कार्ड हे खूप महत्त्वाचे साधन आहे. तुमचे डेबिट कार्ड तुमच्या बँक खात्यांशी जोडलेले असते, आणि प्रत्येक व्यवहाराची रक्कम तुमच्या खात्यातून वजा केली जाते.

क्रेडिट कार्ड तुम्हाला तुमच्या खात्यातील शिल्लक रकमे न वापरता उधारीवर व्यवहार करण्याची परवानगी देतात. निर्दिष्ट क्रेडिट कालावधीच्या आता तुम्हाला ही रकमांची परतफेड करणे बंधनकारक असते. आणि प्रत्येक क्रेडिट कार्डमध्ये एक ठराविक क्रेडिट मर्यादा दिलेली असते, ज्या पलीकडे तुम्ही व्यवहार करून शकत नाही.

क्रेडिट मर्यादा :
तुमच्या क्रेडिट कार्डवर एक ठराविक रकमेची क्रेडिट मर्यादा दिलेली असते, जी तुम्ही कर्ज म्हणून वापरू शकता, यालाच “क्रेडिट मर्यादा” असे म्हणतात. ही क्रेडिट मर्यादा कार्ड धारकास बँकेद्वारे नियुक्त केलेली किंवा क्रेडिट कार्ड जारी करणार्‍या कंपनीद्वारे निश्चित केलेली एक ठराविक रक्कम मर्यादा असते. ही क्रेडिट मर्यादा तुमच्या क्रेडिट कार्डवर उपलब्ध असलेली आणि तुम्ही खर्च करू शकता अशी ती कमाल रक्कम दर्शवते. तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डवर किती क्रेडिट मर्यादा मिळेल हे तुमच्या क्रेडिट स्कोअरच्या आधारे निश्चित केले जाते.

क्रेडिट कार्डचे फायदे :
जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड घेता, तेव्हा तुम्हाला सोबत अनेक फायदे देखील दिले जातात. अनेक वेळा क्रेडिट कार्ड असल्याचा चांगला फायदा होतो. क्रेडिट कार्ड वापरणे खूप किफायतशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला क्रेडिट कार्डच्या 8 जबरदस्त ऑफर्सची माहिती देणार आहोत, ज्याचा तुम्ही जबरदस्त फायदा घेऊ शकता.

क्रेडिट कार्डचे फायदे :
* वेलकम ऑफर्स
* रिवॉर्ड पॉइंट्स/कॅशबॅक/सवलत
* इंधन अधिभार माफ
* मोफत विमानतळ लाउंज प्रवेश
* EMI रूपांतरण
* कुटुंबातील सदस्यांसाठी अॅड-ऑन क्रेडिट कार्ड
* Concierge Service
* विमा संरक्षण

क्रेडिट कार्ड निवड :
क्रेडिट कार्ड घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, हे सर्व फायदे तुम्ही घेत असलेल्या क्रेडिट कार्डमध्ये मिळतीलच असे नाही. प्रत्येक क्रेडिट कार्डचे स्वतःचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. अशा परिस्थितीत या 8 ऑफरपैकी तुम्हाला जी चांगली वाटते ती निवड करा.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Credit card Benefits and uses for card Holders on 24 June 2023.

हॅशटॅग्स

Credit card Benifits(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x