27 April 2024 8:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Tata Group Share | 6 महिन्यात 114% परतावा, आता ही कंपनी टाटा ग्रुपकडे, शेअरमध्ये एंट्री करा, टाटा के साथ नो घाटा

Quick Money Share

Tata Group Share | बिस्लेरी ब्रँड कोणत्या कंपनीचा प्रॉडक्ट आहे, तुम्हाला माहीत आहे? नाही ना? बिस्लेरी बॉटल हा ओरिएंट बेव्हरेजेस कंपनीचा ब्रँड असून या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अपर सर्किटवर ट्रेड करत होते. त्यानंतर कंपनीचे शेअर 179 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही दिवसांपासून ओरिएंट बेव्हरेजेस कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी दिसून आली आहे. मागील एका महिन्याचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, बिस्लेरी ब्रँडशी संबंधित या कंपनीच्या शेअरने एका महिन्यात 81 टक्क्यांची जबरदस्त उसळी घेतली आहे.

शेअर्सच्या वाढीवर कंपनीचे स्पष्टीकरण :
शेअर्समध्ये अचानक आलेल्या वाढीनंतर ओरिएंट बेव्हरेजेस कंपनीने स्पष्टीकरण दिले की, ” मागील अनेक दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया माध्यमांमध्ये बातम्या चालू आहेत की टाटा समूहाने बिस्लेरी बँड खरेदी केला आहे. या बातमीमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक उसळी दिसून आली आहे. आतपर्यंत या बातमी संदर्भात टाटा समूहाकडून कोणताही दुजोरा देण्यात आला नाही. म्हणून आम्ही इतर कोणतीही माहिती सामायिक करू शकत नाही, आणि कंपनीच्या स्टॉकवर या डीलचा होत असलेल्या परिणामाबद्दल अधिक बोलू शकत नाही. असे ओरिएंट बेव्हरेजेस कंपनीने म्हंटले आहे.

ओरिएंट बेव्हरेजेस ही कंपनी बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडची मुख्य फ्रँचायझी आहे. ही कंपनी बिस्लेरी ब्रँड अंतर्गत पश्चिम बंगाल आणि झारखंड राज्यांमध्ये पॅकेज्ड पाण्याच्या बॉटलचे उत्पादन करते आणि त्यांची विक्री करते. ओरिएंट बेव्हरेजेस कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 6 महिन्यांत 114 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. त्याचवेळी 2022 या चालू वर्षात बिस्लेरीशी संबंधित या कंपनीच्या शेअरची किमत 126 टक्क्यांनी वधारली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की ओरिएंट बेव्हरेजेस कंपनी 2005 सालापासून पॅकेज्ड पाण्याचे उत्पादन, विक्री, आणि विपणन करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Group Share of Orient Beverages share price has increased after news spread of Bisleri Brand Aquisition by Tata group on 3 December 2022.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x