4 May 2024 4:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Gold Investment Option | मार्ग श्रीमंतीचा! डिजिटल गोल्ड गुंतवणुकीतून पैसा वाढवा, फायद्याचे विविध पर्याय लक्षात ठेवा

Gold Investment Option

Gold Investment Option | आपल्या देशात शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, मग दिवस सणासुदीचा असो किंवा लग्नाचा, आपण सोने खरेदी करतो. भारतात सणासुदीच्या आणि लग्नाच्या सीझनमध्ये सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. आजकाल सोने वैयक्तिक वापरासाठी किंवा दागिने बनवण्यासाठी मर्यादित राहिला नसून सोने गुंतवणुकीचा ही सर्वात सुरक्षित पर्याय बनला आहे. सोन्यात तुम्ही अनेक प्रकारे गुंतवणुक करू शकता. या पद्धतीमध्ये तुम्हाला सोने साठवून ठेवण्याची गरज नाही. सध्या जर तुम्ही सोन्यात गुंतवणुक करू इच्छित असाल तर या लेखात आम्ही तुमच्यासाठी काही जाबरदस्त पर्याय घेऊन आलो आहोत, त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या-

गोल्ड बार किंवा सोन्याचे नाणे :
चमकणाऱ्या या पिवळ्या धातूमध्ये गुंतवणूक करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे सोन्याची नाणी किंवा बिस्किट खरेदी करणे. या प्रकारच्या घन सोन्यात गुंतवणूक करण्याचा फायदा म्हणजे त्यांचा मेकिंग चार्ज अगदी नाममात्र असतो, आणि सोन्याच्या दागिन्यांच्या तुलनेत बिस्कीट आणि गोल्ड बार पुनर्विक्री करताना चांगले मूल्य प्राप्त करून देते.

डिजिटल गोल्ड :
डिजिटल गोल्ड हा शुद्ध सोन्याची साठवून न करता डिजिटल स्वरूपात गुंतवणूक करण्याचा हा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग मानला जातो. आजकाल तुम्ही डिजिटल सोने ऑनलाइन खरेदी आणि विक्री करू देखील करु शकता. ऑनलाईन डिजिटल गोल्ड खरेदी केल्यानंतर ते ग्राहकाच्या ऑनलाईन वॉलेट मध्ये जमा केले जाते. एवढेच नाही तर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही डिजिटल गोल्डचे रूपांतर नंतर प्रत्यक्ष सोन्यात देखील करू शकता.

सार्वभौम गोल्ड बाँड/SGB :
सार्वभौम गोल्ड बाँड म्हणजेच SGB हे भारतीय रिझर्व्ह बँकद्वारे वेळोवेळी जारी केले जाणारे गोल्ड बाँड असते. SGB RBI द्वारे सोन्याच्या प्रचलित दराने त्याच्या वजनावर आधारित निश्चित व्याजदरासह ऑफर केले जातात. या SGB चा लॉक-इन कालावधी 5 वर्षे आणि किमान परिपक्वता कालावधी 8 वर्षे निश्चित करण्यात आला आहे. SGB ची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर, गुंतवणूकदारांना त्या सोन्याच्या किमती एवढीचरक्कम परतावा म्हणून दिली जाते. पोस्ट ऑफिस, बँका किंवा स्टॉक एक्सचेंज ॲपद्वारे SGB मध्ये गुंतवणूक सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड/G-ETF :
गोल्ड ईटीएफ हे प्रकारचे एक्सचेंज ट्रेडेड म्युच्युअल फंड असते, जे प्रत्यक्ष सोने, सार्वभौम सुवर्ण रोखे/SGB आणि डिजिटल सोन्याच्या साठ्यामध्ये पैसे लावताय. हे गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/ BSE वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज/NSE निर्देशांकावर सूचीबद्ध झालेले असतात. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यावर तुम्हाला प्रत्यक्ष सोन्याच्या खरेदीवर भरावा लागणार कोणताही कर द्यावा लागत नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Gold Investment Option in Digital Gold to Invest money in Secure Scheme for earning Good returns on 05 December 2022.

हॅशटॅग्स

Gold Investment Option(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x