3 May 2024 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

Multibagger Stock | पैसाच पैसा! बँक FD देणार नाही पण या शेअरने 444% बंपर परतावा दिला, स्टॉक नेम जाणून घ्या

Multibagger Stock

Multibagger Stock | लोकांना आपल्या KBC शो च्या माध्यमातून करोडपती बनवणारे बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी काही वर्षापूर्वी एका स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती. वास्तविक 2017 मध्ये ‘DP वायर्स’ या स्मॉलकॅप कंपनीचा IPO शेअर बाजारात आला होता. बिग बींनी DP वायर्स या आयपीओमध्ये गुंतवणूक केली होती, आणि त्यांनी पाच वर्षे आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली ज्याचे फळ आता त्यांना मिळत आहे. बिग बींना हा संयम राखण्याचे जबरदस्त फळ मिळत आहे. IPO मध्ये गुंतवणूक केलेल्या लोकाचे पैसे आता पाचपट अधिक वाढले आहे. DP वायर्स या कंपनीचा IPO स्टॉक मार्केटमध्ये NSE SME एक्सचेंजवर सूचीबद्ध करण्यात आला होता.

अमिताभ बच्चन यांची DP वायर्समध्ये होल्डिंग :
5 ऑक्टोबर 2017 रोजी NSE इमर्ज प्लॅटफॉर्मवर DP वायर्स कंपनीचा स्टॉक लिस्ट झाल्यापासून अमिताभ बच्चन यांच्या कडे या कंपनीचे 2.45 टक्के म्हणजे 13,41,18,400 शेअर्स आहेत. 17 जानेवारी 2022 रोजी DP वायर्स कंपनीचा स्टॉक BSE NSE मेनबोर्डवर स्थलांतरित करण्यात आला होता. ज्या वेळी या कंपनीचा IPO आला होता, त्यात शेअरची इश्यू किंमत 75 रुपये निश्चित करण्यात आली होती. डीपी वायर्स कंपनीमध्ये बिग बींनी केलेय गुंतवणुकीचे मूल्य सध्या 13.4 कोटी रुपये झाले आहे.

शेअरची किंमत :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NSE निर्देशांकावर DP वायर्स कंपनीचे शेअर 408 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. DP वायर्स कंपनीचा IPO मार्केटमध्ये सूचीबद्ध झाल्यापासून 444 टक्के बंपर परतावा कमावून दिला आहे. चालू वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आतापर्यंत 58 टक्के परतावा दिला आहे.

कंपनीचा नफा वाढला :
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये DP वायर्स कंपनीचा नफा 51.2 टक्के वाढला आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षात 9.03 कोटी रुपये नफा कमावला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने 5.97 कोटी रुपये नफा कमावला होता. कंपनीच्या सेल्समध्ये जुलै-सप्टेंबर या कालावधीत 114.77 टक्के वाढ झाली असून एकूण सेल्स 283.96 कोटी रुपयेवर गेली आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीच्या एकूण सेल्सचे मूल्य 132.22 कोटी रुपये होते. कंपनीचा EBITDA 42.7 टक्के वाढून 13.10 कोटी झाला आहे. 5 डिसेंबर 2022 पर्यंत DP वायर्स कंपनीचे बाजार भांडवल 550 कोटी रुपये आहे.

बिग बी यांची सध्याची गुंतवणूक :
ट्रेंडलाइन डेटानुसार बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडे DP वायर्स कंपनीचे एक टक्के भाग भांडवल शिल्लक राहिले आहेत. कंपन्यांच्या शेअर धारकांच्या यादीत फक्त अशा भाग धारकांच्या नावाचा समावेश केला जातो, ज्यांच्याकडे कंपनीचे 1 टक्के पेक्षा अधिक भाग भांडवल आहेत. यापूर्वी बिग बींच्या पोर्टफोलिओमध्ये फिनोटेक्स फॅशन, बिर्ला पॅसिफिक मेडस्पा आणि न्यूलँड लॅब्स कंपनीचे शेअर्स देखील सामील होते. DP वायर्स कंपनीच्या प्रवर्तकांकडे एकुक भाग भांडवल पैकी 70.4 टक्के वाटा आहे. या कंपनीमध्ये सध्या कोणतीही संस्थात्मक आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक झालेली नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock of DP Wires Limited share price has increased on 06 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x