15 May 2024 4:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Money From IPO | आयपीओ शेअरची किंमत 52 ते 54 रुपये, 38 पट सबस्क्राईब झालाय, पहिल्याच दिवशी मोठा परतावा मिळणार

Money from IPO

Money From IPO | DroneAcharya Aerial Innovations कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आयपीओ उघडताच गुंतवणूकदार या स्टॉकवर तुटून पडले. या IPO चे पहिल्या दिवशी 22.94 पट सबस्क्रिप्शन झाले आहेत. काल IPO उघडल्यावर दिवसाच्या काही तासात DroneAcharya Aerial Innovations कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला वाटा 37.89 पट अधिक सबस्क्राइब झाला. आयपीओ खुला झाल्यावर सुरुवातीच्या चार तासांत स्टॉक 6 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे.

DroneAcharya Aerial Innovations कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाल्यावर पहिल्या दिवशी दुपारी 1:36 पर्यंत 6.76 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला वाटा 12.91 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे.

ग्रे मार्केटमध्ये शेअरची स्थिती :
DroneAcharya Aerial Innovations कंपनीचा IPO ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त ट्रेंड करत आहे. शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते, आज ग्रे मार्केटमध्ये DroneAcharya Aerial Innovations कंपनीचे शेअर्स 70 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 52 ते 54 रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स अंदाजे 124 रुपयेवर सूचीबद्ध होऊ शकतात. जर स्टॉक लिस्टिंग पर्यंत प्रीमियम किमतीवर ट्रेड करत राहिला तर गुंतवणूक करणाऱ्यांना लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 129.63 टक्के परतावा मिळेल. गुंतवणूकदार या कंपनीच्या IPO मध्ये 15 डिसेंबर 2022 पर्यंत गुंतवणूक करू शकतात. या कंपनीचे शेअर्स बीएसई एसएमई एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध केले जातील.

ड्रोन कंपनीबद्दल :
ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनी IPO मधून जो फंड जमा करेल तो फंड ड्रोन खरेदी आणि निर्मितीसाठी खर्च केला जाणार आहे. याशिवाय कंपनी आपल्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठीही हा निधी खर्च करणार आहे. या कंपनी मार्च 2023 पर्यंत 12 नवीन प्रशिक्षण केंद्रे सुरू करणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत या कंपनीने 308.96 लाख रुपये महसूल संकलित केला होता. कंपनीने मागील तिमाहीत 72.06 लाख रुपये निव्वळ नफा कमावला होता.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा, एमएस राव यांनी या ड्रोन कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. काही एजल्स गुंतवणूकदारांनीही या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे. ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स ही कंपनी DGCA कडून रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन परवाना मिळवणारी पहिली खाजगी कंपनी आहे. मार्च 2022 पासून या कंपनीने 180 पेक्षा जास्त ड्रोन वैमानिकांना प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र जारी केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money from IPO of DroneAcharya Aerial Innovations share price has increased in gray market on 14 December 2022.

हॅशटॅग्स

Money From IPO(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x