27 April 2024 7:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Kfin Technologies IPO | केफिन टेक्नॉलॉजीस IPO चे शेअर्सचे वाटप कधी होणार? ग्रे मार्केट मध्ये स्टॉक ची कामगिरी कशी? वाचा

Kfin Technologies IPO

KFin Technologies IPO | केफिन टेक्नॉलॉजीस कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या IPO च्या शेवटच्या दिवशी स्टॉक 2.59 पट अधिक सबस्क्राईब झाले. 21 डिसेंबर 2022 रोजी हा IPO गुंतवणुकीसाठी बंद झाला होता. या IPO इश्यूमध्ये 2,37,75,215 शेअर्स जरी करण्यात आले होते, त्यावे 6,14,67,520 शेअर्सची बोली प्राप्त झाली होती. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 317-366 रुपये प्रति शेअर जाहीर करण्यात आली होती.

शेअर्स 2 रुपयांच्या प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते
स्टॉक मार्केट निरीक्षकांच्या मते आज ग्रे मार्केटमध्ये केफिन टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स 2 रुपयांच्या प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स 29 डिसेंबर 2022 रोजी शेअर बाजारात BSE आणि NSE निर्देशांकावर सूचीबद्ध होणार आहेत. ज्या लोकांना या IPO मध्ये शेअर्स प्राप्त होतील त्यांना स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी 2 रुपये प्रति शेअर नफा मिळेल.

केफिन टेक्नॉलॉजीस कंपनीचे IPO शेअर पुढील आठवड्यात सोमवार दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी वाटप करण्यात येईल. बुधवार दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात शेअर्स जमा होतील. या IPO साठी साठी रजिस्ट्रार म्हणून बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नियुक्त करण्यात आले होते. IPO मध्ये वाटप केल्या जाणाऱ्या शेअर्सचे स्टेटस रजिस्ट्रारच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा येथे BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाइटवर तपासता येतील.

पात्र संस्थात्मक खरेदीदार जो कोटा राखीव ठेवण्यात आला होता, तो 4.17 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 1.36 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा 23 टक्के सबस्क्राईब झाला होता. या वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या केफिन टेक्नॉलॉजीस कंपनीने IPO लाँच करण्या आधी अँकर गुंतवणूकदारांकडून 675 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती.

केफिन टेक्नॉलॉजीस कंपनीचा IPO विद्यमान प्रवर्तक जनरल अटलांटिक सिंगापूर फंडद्वारे ऑफर फॉर अंतर्गत जारी करण्यात आला आहे. यात कंपनीचे स्टॉक विकणारे प्रमोटर 1500 कोटी रुपये भांडवल जम करतील. कंपनीला IPO मधून कोणतीही रक्कम मिळणार नाही. कंपनीचे प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाकडे या कंपनीचे एकूण 74.37 टक्के भाग भांडवल आहेत.

केफिन टेक्नॉलॉजीस एक गुंतवणूकदार आणि जारीकर्ता समाधान प्रदाता आहे. केफिन टेक्नॉलॉजीस कंपनी म्युच्युअल फंड, पर्यायी गुंतवणूक निधी, संपत्ती व्यवस्थापक, पेन्शन फंड आणि कॉर्पोरेट जारीकर्ता म्हणून काम करते तसेच दक्षिणपूर्व आशिया आणि हाँगकाँगमधील आपल्या आंतरराष्ट्रीय ग्राहकांना ही सेवा प्रदान करते. सप्टेंबर 2022 पर्यंत केफिन टेक्नॉलॉजीस ही अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आपल्या ग्राहकांच्या संख्येवर आधारित भारतीय म्युच्युअल फंडांना आपल्या सेवा प्रदान करणारी देशातील सर्वात मोठी गुंतवणूकदार समाधान प्रदाता कंपनी आहे. केफिन टेक्नॉलॉजीस कंपनीच्या IPO ऑफरसाठी ICICI सिक्युरिटीज, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, जेपी मॉर्गन इंडिया, IIFL सिक्युरिटीज आणि जेफरीज इंडिया यांना IPO स्टॉक विक्रीचे व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Kfin Technologies IPO Stock distribution and listing of shares on 23 December 2022.

हॅशटॅग्स

#KFin Technologies IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x