27 April 2024 4:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Multibagger Stock | बक्कळ कमाई! अवघ्या 2.5 वर्षांत या शेअरने पैसे 10 पट वाढवले, पुढची टार्गेट प्राईस पहा

Multibagger Stock

Multibagger Stock | शेअर बाजारात अनेक कंपन्यां आहेत, ज्यांच्या शेअर्सनी दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा मिळवून दिला आहे. यामध्ये स्मॉल कॅप कंपन्यांच्या अल्प दरातील शेअर्सनी परताव्याच्या बाबतीत मोठ मोठ्या बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांनाही मागे टाकले आहे. उषा मार्टिन लिमिटेड नावाच्या पोलाद निर्मात्या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीचे मूल्य 10 पट अधिक वाढवले ​​आहे. आज उषा मार्टिन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.55 टक्के घसरणीसह 174.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. NSE इंडेक्सवर आज हा स्टॉक 174.80 रुपये किमतीवर पोहचला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Usha Martin Share Price | Usha Martin Stock Price | BSE 517146 | NSE USHAMART)

अडीच वर्षात 10 पट अधिक परतावा :
मे 2020 मध्ये उषा मार्टिन कंपनीचे शेअर 13.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज हा स्टॉक लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. आज या कंपनीच्या शेअरमध्ये 1.55 टक्क्यांची घसरण झाली आहे. मागील अडीच वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशात 10 पट अधिक वाढ केली आहे. मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त पडझड पाहायला मिळाली होती. उषा मार्टिन कंपनीचे शेअर्स काल 5 टक्क्यांनी वाढले होते, मात्र आज स्टॉक 1.55 टक्के पडला आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
या कंपनीच्या शेअर्सनी मागील 22 वर्षात आपल्या शेअर धारकांना 1,295.93 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर किमतीमध्ये 481 टक्के वाढ झाली आहे. 2022 या वर्षात या कंपनीच्या स्टॉकने लोकांना मजबूत परतावा मिळवून दिला आहे. 2022 या वर्षात आतापर्यंत या स्टॉकमध्ये 53 टक्क्यांची वाढ झाली आहे. मनीकंट्रोल वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, पुढील 3-6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 149-162 रुपयांनी वाढू शकतात. तज्ञांनी लाँग पोझिशन्ससाठी या स्टॉकमध्ये 104 रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
उषा मार्टिन लिमिटेड कंपनी वायर उत्पादन आणि वायर निर्मिती साठी लागणाऱ्या वस्तूचे उत्पादन करण्यात अग्रणी कंपनी मानली जाते. जागतिक स्तरावर ही कंपनी वायर उत्पादन करणाऱ्या 5 टॉप उत्पादकांपैकी एक मानली जाते. उषा मार्टीन कंपनी मुख्यतः लोहखनिज, कोळसा आणि वायर रोप्स स्टीलचे उत्पादन, विपणन, आणि विक्री करते. या कंपनीने आपले उत्पादन केंद्र रांची, जमशेदपूर, बेंगळुरू, होशियारपूर आणि आग्रा या ठिकाणी स्थापन केले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock of Usha Martin Share Price in focus over returns check details on 28 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x