20 May 2024 5:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

PI Industries Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 1 लाखावर दिला 26 लाख परतावा, नवी टार्गेट प्राईस पहा, स्टॉक खरेदीला गर्दी

PI Industries Share Price

PI Industries Share Price | ज्या लोकांनी ‘पीआय इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांनी दीर्घकाळात उत्कृष्ट परतावा कमावला आहे. ‘पीआय इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 2,400 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 7 जानेवारी 2013 रोजी या कंपनीचे शेअर 127 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवार दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी ‘पीआय इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 3296.45 रुपयेवर पोहचले आहेत. बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.90 टक्के घसरणीसह 3265 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कालावधीत 2013 साली जर तुम्ही या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणूकीचे मूल्य वाढून 26 लाख रुपये झाले असते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PI Industries Share Price | PI Industries Stock Price | BSE 523642 | NSE Piind)

शेअरची वाटचाल :
‘पीआय इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 14.17 टक्के नफा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या स्टॉकने 09 नोव्हेंबर 2022 रोजी 3,698.50 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी स्पर्श केली होती. 27 जानेवारी 2022 रोजी या कंपनीच्या शेअरनी 2,334.35 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. ब्रोकरेज फर्म शेअरखानच्या मते, पीआय इंडस्ट्रीज कंपनीचे चे मजबूत ताळेबंद दीर्घकालीन ऑरगॅनिक वाढीला भरपूर वाव देते.

शेअरची लक्ष्य किंमत :
ब्रोकरेज फिर्मने पीआय इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरवर 4,200 रुपये ही नवीन लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्म मते कंपनीची देशभरात चांगली उपस्थिती आणि चांगले उत्पादन ऑफर आणि विद्यमान उत्पादने यामुळे व्यापार वृध्दी होण्याचे संकेत मिळत आहेत. देशांतर्गत फॉर्म्युलेशन व्यवसाय देखील चांगल्या स्थितीत पाहायला मिळत आहे.

तज्ञांचे स्टॉकबाबत मत :
एंजेलवन फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, CSM व्यवसाय पुढील 2 ते 3 वर्षात 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. PI इंडस्ट्रीज कंपनीचा महसूल / PAT CAGR आर्थिक वर्ष 2022 ते 2024 दरम्यान 17 टक्के / 24 टक्के राहील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. कंपनीने अनेक नवीन विभाग सुरू केले आहेत, त्यात इलेक्ट्रॉनिक रसायने आणि API सामील आहेत. या सेगमेंटमध्ये प्रवेश केल्याने कंपनीला पुढील 3 ते 4 वर्षांमध्ये व्यापार वाढ करण्यास मदत होईल. एंजेल वन फर्मने स्टॉकवर ‘BUY’ रेटिंग देऊन शेअर्स, खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म ने शेअरसाठी 4,000 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PI Industries Share Price 523642 Piind in focus check details on 11 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x