16 May 2024 6:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Droneacharya Aerial Innovations Share Price | 1 आठवड्यात 300% परतावा, आज 5% परतावा, स्टॉक खरेदी करणार?

Droneacharya Aerial Innovations Share Price

Droneacharya Aerial Innovations Share Price | ‘ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स’ कंपनीचा आयपीओ मल्टीबॅगर ठरला आहे. या कंपनीचे शेअर्स लिस्टिंगपासून आपल्या शेअर धारकांना छप्परफाड पैसा मिळवून देत आहेत. ‘ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स’ कंपनीचा IPO 23 डिसेंबर 2022 रोजी 54 रुपये इश्यू किमतीवर सूचीबद्ध करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरमध्ये 307 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला होता. बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी ‘ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स’ कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 231.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Droneacharya Aerial Innovations Share Price | Droneacharya Aerial Innovations Stock Price | BSE 543713)

कंपनीमध्ये गुंतवणुक करणाऱ्या लोकांच्या यादीत बॉलीवूड स्टार ‘आमिर खान’ आणि ‘रणबीर कपूर’ यांचा ही समावेश आहे. लिस्टिंग झाल्यापासून या स्टॉकमध्ये सतत अप्पर सर्किट लागत आहे. तसेच दिग्गज गुंतवणूकदार ‘शंकर शर्मा’ यांचनी देखील स्टॉकमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे.

IPO 243.70 पट सबस्क्राइब झाला :
BSE वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार ‘ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स’ कंपनीचा IPO शेवटच्या दिवशी 243.70 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीने आपल्या IPO द्वारे 33.97 कोटी रुपये भांडवल जमा करण्याचे लक्ष निर्धारित केले होते. या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 330 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. त्याच वेळी गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 287 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 46 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

शेअरची वाटचाल :
‘ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स’ कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या कंपनीचा आयपीओ 13 ते 15 डिसेंबर 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी अर्जांसाठी खुला होता. कंपनीने IPO ची किंमत 52 ते 54 रुपये प्रति शेअर जाहीर केली होती. किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट मध्ये 2000 शेअर्स जारी करण्यात आले, आणि त्यासाठी गुंतवणुकदारांना 1.08 लाख रुपये जमा करावे लागले.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स’ कंपनीने मार्च 2022 पासून 180 पेक्षा अधिक ड्रोन वैमानिकांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. ‘DGCA’ ने रिमोट ‘पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ परवाना जारी केलेली ही भारतातील पहिलीच खाजगी कंपनी आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत या कंपनीने 3.09 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. कंपनीने पहिल्या तिमाहीत 72.06 लाख रुपये निव्वळ नफा कमावला होता. ही कंपनी सध्या स्वदेशी ड्रोन बनविण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Droneacharya Aerial Innovations Share Price 543713 in focus check details on 11 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x