12 May 2024 7:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

SEL Manufacturing Share Price | 1 लाखावर 2.46 कोटी रुपये परतावा देणारा शेअर 40% स्वस्त झालाय, स्टॉक बाबत काय करावं?

SEL Manufacturing Share Price

SEL Manufacturing Share Price | सोमवार दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी ‘सेल मॅन्युफॅक्चरिंग’ कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 526.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचा स्टॉक एप्रिल 2022 मध्ये NSE निर्देशांकावर 1975.80 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहोचल्यानंतर विक्रीच्या दबावाखाली आले. आणि आता शेअर 526.40 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील सहा महिन्यांत NSE इंडेक्सवर या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरमध्ये 40 टक्क्यांहून अधिक पडझड पाहायला मिळाली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 40 टक्क्यांहून कमजोर झाली असूनही हा स्टॉक मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत आपले स्थान राखून आहे. ‘एसईएल मॅन्युफॅक्चरिंग’ कंपनीच्या स्टॉकने मागील दोन वर्षांत आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. दोन वर्षापूर्वी हा स्टॉक 2.25 रुपयांवर ट्रेड करत होता, मात्र शेअरमध्ये जबरदस्त वाढ झाली आणि शेअरची किंमत 1900 रुपये पर्यंत पोहचली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sel Manufacturing Share Price | Sel Manufacturing Stock Price | BSE 532886 | NSE SELMC)

शेअरमध्ये विक्रीचा दबाव :
सेल मॅन्युफॅक्चरिंग’ या स्मॉल-कॅप कंपनीचे शेअर्स एप्रिल 2022 पासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. तथापि, विक्रीचा दबाव वाढण्याआधी या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला होता. या मल्टीबॅगर स्टॉकची किंमत मागील एका महिन्यात 15 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. हा मल्टीबॅगर स्टॉक मागील सहा महिन्यांत 925 रुपयांवरून पडत असून सध्या 526 रुपयांपर्यंत पडला आहे. या कालावधीत शेअरची किंमत 40 टक्क्यांहून अधिक घटली आहे. तथापि, मागील सहा महिन्यांत या स्टॉकमध्ये 40 टक्क्यांहून अधिक घसरण होऊनही, गेल्या एका वर्षात या स्टॉकने लोकांना 750 टक्के परतावा कमावून दिला आहे.

शेअरची वाटचाल :
15 जानेवारी 2021 रोजी, सेल मॅन्युफॅक्चरिंग’ कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 2.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या हा स्टॉक 526 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. याचा अर्थ या पेनी स्टॉकने मागील दोन वर्षांत आपल्या शेअर धारकांना 24,500 टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे. जर तुम्ही एसईएल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या स्टॉक डेटा पॅटर्नचे निरीक्षण केले तर तुम्हाला समजेल की, एका महिन्यापूर्वी तुम्ही या स्मॉल-कॅप स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 लाख रुपयेवरून 85,000 रुपयांवर आले असते. जर तुम्ही सहा महिन्यांपूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होऊन 60,000 रुपयेवर आले असते.

1 लाखावर 2.46 कोटी रुपये परतावा :
जर तुम्ही एक वर्षभरापूर्वी या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 8.50 लाख झाले असते. त्याचप्रमाणे जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी या पेनी सॉकमध्ये एक लाख रुपये लावले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 2.46 कोटी रुपये झाले असते. यासाठी स्टॉक इतका दीर्घ काळ होल्ड करण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये खूप संयम असणे आवश्यक आहे. हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक NSE आणि BSE या दोन्ही इंडेक्सवर ट्रेड करत आहे. या कंपनीचे ब्बाजार भांडवल 1,835 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SEL Manufacturing Share Price 532886 SELMC in focus check details on 16 January 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x