4 May 2024 7:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Fertilizers and Chemicals Travancore Share Price | 7 महिन्यांत शेअर्समध्ये 265% परतावा, एकूण परतावा 1000%, स्टॉक खरेदी करणार?

Fertilizers and Chemicals Travancore Share Price

Fertilizers and Chemicals Travancore Share Price | सरकारी मालकीच्या ‘फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही वर्षांत अप्रतिम वाढ पाहायला मिळाली आहे. मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 27 रुपयेवरून 300 रुपयांवर पोहोचली आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. 1 डिसेंबर 2022 पासून आतापर्यंत ‘फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर’ कंपनीच्या शेअरची किंमत 120 टक्के मजबूत झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fertilizers & Chemicals Travancore Share Price | Fertilizers & Chemicals Travancore Stock Price | BSE 590024 | NSE FACT)

गुंतवणुकीवर परतावा :
‘फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. 20 मार्च 2020 रोजी या सरकारी खत कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 26.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या सरकारी कंपनीचे शेअर्स 20 जानेवारी 2023 रोजी बीएसई निर्देशांकावर 317.95 रुपयांवर पोहचले होते. आज सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.72 टक्के वाढीसह 327.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही 20 मार्च 2020 रोजी फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 11.81 लाख रुपये झाले असते.

7 महिन्यांत शेअर्समध्ये 265 टक्के वाढ :
फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर कंपनीच्या शेअर्सची किंमत अवघ्या 7 महिन्यांत 265 टक्के वाढली आहे. 20 जून 2022 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 87.15 रुपये किंमत पातळीवर पोहचले होते. या कंपनीचे शेअर्स 20 जानेवारी 2023 रोजी BSE निर्देशांकावर 317.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज स्टॉकची किंमत वाढून 327.25 रुपये किमतीवर पोहचली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 390 रुपये होती, तर या सरकारी मालकीच्या खत निर्मिती कंपनीच्या शेअर्स 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 82.35 रुपये होती. फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 202 टक्के पेक्षा अधिक वधारले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Fertilizers and Chemicals Travancore Share Price 590024 stock market live on 23 January 2023.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x