2 May 2024 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार?
x

Sharda Cropchem Share Price | जोरदार कमाई! या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स

Sharda Cropchem share price

Sharda Cropchem Share Price | शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. त्यापैकीच एक कंपनी आहे ‘शारदा क्रॉपकेम’. कोविड महामारीमध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती, मात्र कालांतराने शेअरची किंमत सुधारली. एप्रिल 2022 मध्ये या कंपनीचे शेअर 105 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या शेअरची किंमत 512 रुपये वर पोहोचली आहे. स्टॉक बाबत चर्चा होण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म आनंद राठी यांनी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sharda Cropchem Share Price | Sharda Cropchem Stock Price | BSE 538666 | NSE SHARDACROP)

शारदा क्रॉपकेम कंपनीची कामगिरी :
ब्रोकरेज फर्म आनंद राठी यांनी शारदा क्रॉपकेम कंपनीचे शेअर बऱ्याच काळापासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत असल्याची माहिती आपल्या अहवालात दिली आहे. पुढील काळात या कंपनीच्या शेअरची किंमत 700 रुपये पर्यंत वाढू शकते असा अंदाज आनंद राठी फर्मने कंपनीने व्यक्त केला आहे. स्टॉकच्या दैनदिन चार्ट पॅटर्नवर 500 रुपये ते 510 रुपये किमती जवळ मजबूत सपोर्ट आहे.

बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी शारदा क्रोपकेम कंपनीच्या शेअरमध्ये 6 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली होती. मात्र दिवसा अखेर शेअरच्या किमतीत 4.67 टक्क्यांची पडझड झाली आणि शेअर 512 रुपये किमतीवर क्लोज झाला. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 13 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. सहा महिन्यापूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती त्यांना सध्या तोटा सहन करावा लागत आहे. मागील सहा महिन्यात शारदा क्रॉपकेम कंपनीच्या शेअरची किंमत 3.26 टक्क्यांपेक्षा अधिक घटली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sharda Cropchem Share Price 538666 SHARDACROP stock market live on 26 January 2023.

हॅशटॅग्स

#Sharda Cropchem Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x