27 April 2024 10:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Sindhu Trade Links Share Price | या शेअरने 2 लाखांवर दिला करोडोचा परतावा, पेनी स्टॉक 54 पट वाढला, स्टॉक सेव्ह करा

Sindhu Trade Links Share Price

Sindhu Trade Links Share Price | मागील एक वर्षापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरतेचे आणि गोंधळाचे वातावरण आहे. 2021 मध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजाराने आपली उच्चांक पातळी स्पर्श केली होती, मात्र त्यानंतर शेअर बाजारात अस्थिरता आणि विक्रीचा दबाव वाढू लागला. रशिया-युक्रेन युद्ध, उच्च महागाई दर, बँकांचे व्याजदर, आर्थिक मंदीची भीती, चीन-तैवान तणाव इत्यादींचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे. तथापि, अशा परिस्थितीतही अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. ‘सिंधू ट्रेड लिंक्स लिमिटेड’ हा असा स्टॉक आहे ज्याने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अल्पावधीत अनेक पटींनी वाढवले आहे. बुधवारी (०१ फेब्रुवारी २०२३) हा शेअर 1.99% घसरून 22.20 रुपयांवर क्लोज झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sindhu Trade Links Share Price | Sindhu Trade Links Stock Price | BSE 532029)

एका वर्षातील शेअरची कामगिरी :
30 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स फक्त 3.8 रुपयांवर ट्रेड करत होते. मात्र आता शेअरची किंमत वाढून 30.30 रुपयांवर पोहोचली आहे. मागील एका वर्षात या स्टॉकची किंमत 697 टक्क्यांनी वर गेली आहे. या कालावधीत सिंधू ट्रेड लिंक्स कंपनीचा स्टॉक जवळपास 8 पट अधिक वाढला आहे. जर तुम्ही एक वर्षभरापूर्वी या स्टॉकवर 12-13 लाख रुपये लावले असते तर आत्तापर्यंत तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटींच्या वर गेले असते. दुसरीकडे या कालावधीत सेन्सेक्समध्ये 2.74 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

शेअरमधील हालचाल :
मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरची किंमत 9.51 टक्क्यांनी खाली आली आहे. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी सिंधू ट्रेड लिंक्स कंपनीचे शेअर्स 4.86 टक्के कमजोरीसह 22.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘सिंधू ट्रेड लिंक्स’ कंपनीचे बाजार भांडवल 4,672 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात ‘सिंधू ट्रेड लिंक्स’ कंपनीचे शेअर्स 22 टक्के वाढले आहेत. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 834 टक्क्यांनी वर गेली आहे. या कंपनीचे शेअर्स फेब्रुवारी 2017 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. स्टॉक लिस्टिंगच्या वेळी शेअरची किंमत फक्त 0.56 पैसे होती. जर तुम्ही पाच वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये दोन लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य एक कोटी पेक्षा जास्त झाले असते.

सध्या या कंपनीचे शेअर्स सेबीच्या निरीक्षणाखाली आहे. कारण शेअरच्या किमतींमध्ये असामान्य हालचाल, अस्थिर व्यापार यामुळे स्टॉक अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यात आला आहे. जर कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नचे निरीक्षण केले तर तुम्हाला समजेल की, 2 लाख रुपयांपर्यंत भांडवल असलेल्या 14,576 किरकोळ शेअर धारकांकडे जून तिमाहीच्या अखेरीस कंपनीचे 1.54 कोटी शेअर्स होते. कंपनीच्या 34 प्रवर्तकांकडे कंपनीचे 115.59 कोटी शेअर्स म्हणजेच जवळपास 74.97 टक्के भाग भांडवल आहे. 2 लाखांपेक्षा जास्त भांडवल असलेल्या 87 सार्वजनिक स्टॉक धारकांकडे या कंपनीचे 20.67 कोटी शेअर्स होल्ड आहेत, याचे प्रमाण 13.41 टक्के आहे.

जून 2022 या तिमाहीमध्ये कंपनीने 5.45 कोटी रुपयये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीच्या तुलनेत निव्वळ नफा 126 टक्क्यांनी वाढला आहे. मार्च 2022 च्या तिमाहीमध्ये कंपनीला 20.75 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. जून 2022 तिमाहीत कंपनीच्या सेल्स चे प्रमाण 12 टक्क्यांनी वाढून 245.50 कोटी रुपयेवर पोहचले होते. जून 2022 च्या तिमाहीत कंपनीचे सेल्स 219.33 कोटीवर गेले होते. ही कंपनी मुख्यतः वाहतूक, लोडिंग, खाणकाम यांसारख्या क्षेत्रात व्यापार करते. याशिवाय कंपनी स्पेअर पार्ट्स, इंधन आणि हाय-स्पीड डिझेल यांचा देखील व्यापार करते. या कंपनीच्या अनेक उपकंपन्यां कार्यरत आहेत, ते म्हणजे हरी भूमी कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडस ऑटोमोटिव्ह्ज प्रायव्हेट लिमिटेड, सुधा बायो पॉवर प्रायव्हेट लिमिटेड, परम मित्र रिसोर्सेस या उपकंपन्यां कार्यरत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sindhu Trade Links Share Price 532029 stock market live on 02 February 2023.

हॅशटॅग्स

#Sindhu Trade Links Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x