15 May 2024 10:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Jayant Infratech Share Price | एक नंबर शेअर! 316% परतावा दिला, आता 1 शेअरवर 2 फ्री शेअर्स मिळणार, लॉटरी लागली

Jayant Infratech Share Price

Jayant Infratech Share Price | जेव्हा गुंतवणूकदार स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतात, तेव्हा जास्तीत जास्त नफा कमावणे हा त्यांचा हेतू असतो. ‘जयंत इन्फ्राटेक लिमिटेड’ या SME कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. भरघोस परतावा दिल्यानंतर कंपनीने आता आपल्या गुंतवणूकदारांमध्ये बोनस शेअर्सही वितरीत करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअरची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रीहिण्या कंपनीचे शेअर्स 9.53 टक्के वाढीसह 400.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jayant Infratech Share Price | Jayant Infratech Stock Price | BSE 543544)

स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने म्हंटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक नुकताच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संचालकांनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. कंपनीने या बोनस इश्यूसाठी 1 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. म्हणजेच रेकॉर्ड तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदाराचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये सामील असेल, त्यांना कंपनी मोफत बोनस शेअरची लाभ देणार आहे.

कंपनी बद्दल थोडक्यात :
‘जयंत इन्फ्राटेक’ कंपनीचा IPO जून 2022 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. कंपनीने आपल्या IPO साठी 67 रुपये प्राइस बँड निश्चित केली होती. या IPO साठी कंपनीने एका लॉटमध्ये 2000 शेअर्स जारी केले होते. या कंपनीचा IPO जवळपास 4 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. आणि बोनस शेअर्स वाटप करणाऱ्या ‘जयंत इन्फ्राटेक लिमिटेड’ कंपनीने सूचीबद्ध झाल्यापासून आपल्या गुंतवणुकदारांना 316.04 टक्के परतावा कमावून दिला आहे. सप्टेंबर 2022 तिमाहीपर्यंत कंपनीमध्ये प्रवर्तकांकडे 71.44 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत. तर किरकोळ गुंतवणूकदारांनी कंपनीचे 28.56 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jayant Infratech Share Price 543544 stock market live on 10 February 2023.

हॅशटॅग्स

Jayant Infratech Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x