13 May 2024 1:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Alok Industries Share Price | चिंता वाढली! शेअर 39 रुपयांवरून घसरून 25 रुपयांवर आला, स्टॉक Hold करावा की Sell? Income Tax Refund | नोकरदारांनो! तुम्हाला ITR रिफंड कधी मिळणार? पैसे लवकर मिळतील, महत्वाची माहिती जाणून घ्या Adani Enterprises Share Price | मल्टीबॅगर अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सपोर्ट लेव्हल वर टिकणार? पुढची टार्गेट प्राईस? Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जोरदार घसरण, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक चार्ट पॅटर्नने चिंता वाढवली, शेअर किती घसरणार? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस! स्टॉक प्राईस सुद्धा स्वस्त, खरेदीला ऑनलाईन गर्दी Kuber Yog 2024 | कुबेर योग 'या' 4 राशींच्या लोकांसांठी भाग्यशाली, यामध्ये तुमची नशीबवान राशी आहे का?
x

Akashdeep Metal Industries Share Price | मस्तच! 100 रुपयांहून स्वस्त शेअरने 500% परतावा प्लस आता स्टॉक स्प्लिट, डिटेल्स पहा

Akashdeep Metal Industries Share Price

Akashdeep Metal Industries Share Price | ‘आकाशदीप मेटल इंडस्ट्रीज’ या वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीचे शेअर्स विभाजित होणार आहेत. या नॉन बँकिंग वित्तीय कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत 1 : 5 या प्रमाणात शेअर विभाजन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. हा कंपनीने स्टॉक विभाजनाची रेकॉर्ड तारीख म्हणून 23 फेब्रुवारी 2023 हा दिवस निश्चित केला आहे. ‘आकाशदीप मेटल इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी 5.30 टक्के वाढीसह 97.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Akashdeep Metal Industries Share Price | Akashdeep Metal Industries Stock Price | BSE 538778)

3 वर्षांत 500 टक्के परतावा :
‘आकाशदीप मेटल इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षापेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 537 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 13 मे 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 14.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 10 फेब्रुवारी 2023 रोजी ‘आकाशदीप मेटल इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 92.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 105 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 174.50 रुपये होती. त्याच वेळी ‘आकाशदीप मेटल इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 33.30 रुपये होती.

तिमाही नफा 9 टक्क्यांनी घटला :
‘आकाशदीप मेटल इंडस्ट्रीज’ कंपनीचा निव्वळ नफा 2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत 1.04 कोटी रुपये वर आला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 8.77 टक्क्यांनी घट पाहायला मिळाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2021 तिमाहीत कंपनीने 1.14 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने 5.47 कोटी रुपये सेल्स केला होता, जो मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत 2.14 कोटी रुपये होता. कंपनीच्या निव्वळ विक्रीत एका वर्षात 155.61 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. डिसेंबर 2022 तिमाहीत ‘आकाशदीप मेटल इंडस्ट्रीज’ कंपनीचा EPS 1.08 रुपये होता. जो मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत 1.54 रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Akashdeep Metal Industries Share Price 538778 stock market live on 13 February 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x