2 May 2024 4:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा
x

Nykaa Share Price | 'नायका'चा तिमाही निकाल, शेअरमध्ये मोठ्या हालचाली, स्टॉकवर पुढे परिणाम काय होणार?

Nykaa Share Price

Nykaa Share Price| ‘नायका’ कंपनीने 2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीमध्ये 8.19 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ‘नायका’ च्या निव्वळ नफ्यात मागील वर्षीच्या याच तिमाही काळाच्या तुलनेत 70.67 टक्क्यांनी घसरण झाली आहे. ‘नायका’ कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत 27.93 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ‘नायका’ कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्क्यांच्या घसरणीसह 149.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘नायका’ ची मूळ कंपनी ‘FSN ई कॉमर्स व्हेंचर्स’ ही आहे. मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.76 टक्के घसरणीसह 144.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fsn E-Commerce Ventures Share Price | Fsn E-Commerce Ventures Stock Price | Nykaa Share Price | Nykaa Stock Price | BSE 543384 | NSE Nykaa)

कंपनीच्या खर्चात वाढ :
‘नायका’ कंपनीने डिसेंबर 2022 च्या तिमाहीत 33 टक्के जास्त महसूल संकलित केला आहे. कंपनीने एकूण 1462.82 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. ‘नायका’ कंपनीने एका वर्षापूर्वी याच कालावधीत 1098.36 कोटी रुपये महसूल संकलन केला होता. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीच्या खर्चात 36 टक्के वाढ झाली असून एकूण खर्च 1455 कोटी रुपये झाला आहे. एक वर्षभरापूर्वी याच कालावधीत ‘नायका’ कंपनीचा खर्च 1067 कोटी रुपये होता. ‘नायका’ कंपनीचा चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत PBT 12.67 कोटी रुपये नोंदवला गेला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत 36.97 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत ‘नायका’ कंपनीचा EPS 0.03 वर पोहोचला आहे, मागील वर्षी 0.10 होता. ‘नायका’ कंपनीचा EBITDA ऑक्टोबर- डिसेंबर 2022 तिमाहीत 78 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीमध्ये कंपनीचा EBITDA 13 टक्के अधिक होता. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीचा मार्जिन 5.3 टक्के असून या तिमाहीतील GMV वार्षिक 37 टक्के वाढून 2,796 कोटी रुपयेवर गेला आहे.

2023 या नवीन वर्षात ‘नायका’ कंपनीच्या शेअरमध्ये 3 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. ब्रोकरेज हाऊस जेफरीजच्या मते, वाढती स्पर्धा, कडक तरलतेची परिस्थिती, जास्त गुंतवणूक आणि पुरवठ्याचा दबाव यामुळे शेअर मध्ये मंदी पाहायला मिळत आहे. Nykaa कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 36 टक्के कमजोर झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nykaa Share Price 543384 stock market live on 14 February 2023.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x