30 April 2024 12:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC सह हे टॉप 10 शेअर्स खरेदी करा, ट्रेडिंग व्हॉल्यूम विक्रम तोडत आहेत, मोठी कमाई होईल IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार? Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स आता सुसाट तेजीच्या दिशेने, तज्ज्ञांकडून स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राइस जाहीर Infosys Share Price | इन्फोसिस आणि TCS सह 7 IT शेअर्स मालामाल करणार, मिळेल 39 टक्केपर्यंत परतावा SBI Mutual Fund | अशी म्युच्युअल फंड योजना निवडा, अवघ्या 25 हजार रुपयांची गुंतवणूक देईल 16 लाख रुपये परतावा Guru Rashi Parivartan | 'या' 4 भाग्यवान राशींमध्ये तुमची राशी आहे? 1 मे पासून गुरू रशिपरिवर्तन नशीब बदलणार Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

Bosch Share Price | जोरदार कमाई! या शेअरच्या गुंतवणुकीवर 4500% परतावा मिळाला, आता 200% डिव्हीडंड जाहीर

Bosch Share Price

Bosch Share Price | ‘बॉश लिमिटेड’ या ऑटो घटक आणि उपकरणे बनवणाऱ्या कंपनीने आपल्या शेअर धारकांसाठी खुश खबर जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना प्रति शेअर 200 रुपये अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘बॉश लिमिटेड’ कंपनीने लाभांश पेमेंट करण्यासाठी 22 फेब्रुवारी 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. ही लार्ज कॅप कंपनी ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा आणि बांधकाम तंत्रज्ञान, औद्योगिक तंत्रज्ञान आणि मोबिलिटी सोल्यूशन्स विभागांमध्ये तंत्रज्ञान आणि सेवा प्रदान करण्याचे काम करते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Bosch Share Price | Bosch Stock Price | BSE 500530 | NSE BOSCHLTD)

लाभांश कशी मिळणार? :
‘बॉश लिमिटेड’ कंपनीने स्टॉक मार्केट नियामक फाइलिंगमध्ये कळवले आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 14 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. कंपनीच्या संचालक मंडळाने 2022-23 या आर्थिक वर्षात आपल्या शेअर धारकांना 200 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनी 29,493,640 इक्विटी शेअर्सवर अंतरिम लाभांश वाटप करणार आहे. ‘बॉश लिमिटेड’ कंपनी 6 मार्च रोजी किंवा नंतर गुंतवणूकदारांच्या खात्यात अंतरिम लाभांश जमा करायला सुरुवात करेल. ‘बॉश लिमिटेड’ कंपनीचे बाजार भांडवल 51,528 कोटी रुपये आहे.

कंपनीची तिमाही कामगिरी :
‘बॉश लिमिटेड’ कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीत 318.9 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ‘बॉश लिमिटेड’ कंपनीच्या नफ्यात मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 35.75 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ‘बॉश लिमिटेड’ कंपनीने मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत 234.9 कोटी रुपये कमाई केली होती. तथापि कंपनीच्या नफ्यात तिमाही -दर- तिमाही आधारावर 14 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. बॉश कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत 372.4 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीच्या महसूलात 17.7 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 3659.9 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीने 3109.1 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

गुंतवणुकीवर 4500 टक्के परतावा :
बॉश कंपनीच्या शेअर्सनी मागील काही वर्षांत आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा मिळवून दिला आहे. 14 फेब्रुवारी 2003 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 380 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘बॉश लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 14 फेब्रुवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर 17,471.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4500 टक्के परतावा कमावून दिला आहे. बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.37 टक्के वाढीसह 17,825.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 18,300 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांकी किंमत पातळी 12,940.10 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bosch Share Price 500530 BOSCHLTD stock market live on 15 February 2023.

हॅशटॅग्स

Bosch Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x