19 May 2024 3:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा
x

Bajaj Steel Share Price | बँक किती वार्षिक व्याज देईल? या शेअरने 3 वर्षात 1200 टक्के परतावा दिला, डिटेल्स पहा

Bajaj Steel Share Price

Bajaj Steel Share Price | शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी ‘बजाज स्टील इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत व्यवहार करत होते. हा स्टॉक शुक्रवारी 10.41 टक्के वाढीसह 1,070.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिवस भराच्या व्यवहारात ‘बजाज स्टील’ स्टॉक 1098.90 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला होता. मागील 4 ट्रेडिंग सेशनपासून ‘बजाज स्टील’ कंपनीच्या शेअरमध्ये 23 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 460.60 रुपये होती. तर बजाज स्टील कंपनीचे बाजार भांडवल 556.5 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Bajaj Steel Industries Share Price | Bajaj Steel Industries Stock Price | BSE 507944)

बजाज स्टीलच्या शेअर्समध्ये तेजी :
‘बजाज स्टील इंडस्ट्रीज’ कंपनीच्या संचालक मंडळाने प्लॅस्टिक विभागाच्या विक्रीला मान्यता दिली आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने आपला प्लास्टिक विभाग ‘VSA बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीला 4.75 कोटी रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला आहे. VSA बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आयात निर्यात, उत्पादन, प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिक उत्पादनांचा व्यापार करते. ‘बजाज स्टील’ च्या स्टील विभाग आणि सुपरपॅक विभागांतर्गत प्लॅस्टिक व्यवसाय देखील कार्यरत आहे. कंपनीचा सुपरपॅक विभाग मागील काही वर्षांपासून तोट्यात व्यवसाय करतोय. या तोट्यामुळे कंपनीच्या निव्वळ नफ्यावर नकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे.

बजाज स्टीलच्या शेअर्सची वाटचाल :
मागील 6 महिन्यांत ‘बजाज स्टील इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्समध्ये 103 टक्के वाढ पाहायला मिळली आहे. 18 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 527.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘बजाज स्टील’ कंपनीचे शेअर्स 17 फेब्रुवारी 2023 रोजी 1070.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 2023 या नवीन वर्षात ‘बजाज स्टील इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 25 टक्के मजबूत झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये 51 टक्केपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे.

3 वर्षात 1200 टक्के परतावा :
‘बजाज स्टील इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षापेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 1203 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 82.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘बजाज स्टील’ कंपनीच्या शेअर्सने स्थापनेपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 6400 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bajaj Steel Industries Share Price 507944 stock market live on 18 February 2023.

हॅशटॅग्स

Bajaj Steel Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x