22 May 2024 6:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 23 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Sansera Share Price | मालामाल करणारा शेअर गुंतवणूकदारांच्या रडारवर, स्टॉक खरेदीला गर्दी, काय म्हटलं तज्ज्ञांनी? BEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार! स्टॉकचार्ट वर तेजीचे संकेत, खरेदी करणार? HAL Share Price | मल्टिबॅगर PSU HAL स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, हा शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार Suzlon Share Price | शेअर प्राईस रु.46, तज्ज्ञांचा 400% परतावा देणाऱ्या शेअरसाठी 'BUY' रेटिंग, किती टार्गेट प्राईस? IPO GMP | IPO आला रे! ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय, पहिल्याच दिवशी मालामाल होणार SJVN Share Price | तज्ज्ञांकडून SJVN शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 615% परतावा देणारा स्टॉक तुफान तेजीत वाढणार
x

UCO Bank Share Price | सरकारी बँक FD नव्हे, या सरकारी बँकेच्या शेअरने 8 महिन्यांत 140% परतावा दिला, किंमत 25 रुपये

UCO Bank Share Price

UCO Bank Share Price | युको बँक या PSU बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यांपासून प्रचंड वाढ झाली आहे. युको बँकेच्या शेअर्सने मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 110 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 20 ऑक्टोबर 2022 रोजी BSE इंडेक्समध्ये UCO बँकेचे शेअर्स 12.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 फेब्रुवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर युको बँकेचे शेअर्स 25.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी युको बँकेचे शेअर्स 1.57 टक्के कमजोरीसह 25.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. युको बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 38.15 रुपये होती. तर स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 10.52 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, UCO Bank Share Price | UCO Bank Stock Price | BSE 532505 | NSE UCOBANK)

8 महिन्यांत 140 टक्के परतावा :
20 जून 2022 रोजी युको बँकेचे शेअर्स BSE इंडेक्सवर 10.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 फेब्रुवारी 2023 रोजी युको बँक या PSU बँकेचे शेअर्स BSE इंडेक्सवर 25.45 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील 8 महिन्यांत या बँकेच्या गुंतवणूकदारांनी 142 टक्के परतावा कमावला आहे. तर मागील 6 महिन्यांत युको बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 123 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या नवीन वर्षात युको बँकेच्या शेअर्समध्ये 19 टक्के पडझड झाली आहे.

युको बँकेच्या शेअरची लक्ष किंमत :
शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, RBI ने व्याजदरात वाढ केल्यामुळे युको बँकेचे निव्वळ व्याज मार्जिनमध्ये सुधारणा झाली आहे. तर बँकेची एनपीए तरतूद देखील कमी झाली आहे. त्यामुळे तज्ञांना या स्टॉकमध्ये आणखी वाढ होईल असे वाटते, म्हणून त्यांनी गुंतवणूकदारांना 55 रुपये लक्ष किमतीसाठी गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. आर्थिक निकाल आल्यानंतर युको बँकेचे शेअर्स जबरदस्त तेजीत आले. युको बँकेचा एनपीए कमी झाला असून कर्ज पुरवठ्यात जवळपास दुहेरी अंकी वाढ झाली आहे. पुढील काळात हा स्टॉक 55 रुपये पर्यंत पोहचले अड तज्ञांना वाटते म्हणून अनेक तज्ञ स्टॉकबाबत सकारात्मक मत व्यक्त करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | UCO Bank Share Price 532505 UCOBANK stock market live on 21 February 2023.

हॅशटॅग्स

UCO Bank Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x