14 May 2024 7:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Supreme Petrochem Share Price | शेअर असावा तर असा! अवघ्या 69 हजार रुपयांवर 1 कोटी रुपये परतावा दिला, तेजी सुरूच

Supreme Petrochem Share Price

Supreme Petrochem Share Price | ‘सुप्रीम पेट्रोकेम’ या पॉलिस्टीरिन पॉलिमर बनवणाऱ्या आणि निर्यात करणाऱ्या भारतातील सर्वात मोठया कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. 2023 या नवीन वर्षात या वर्षी कंपनीच्या शेअर्सची किंमत 7 टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.83 टक्के वाढीसह 372.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञांनी स्टॉकमध्ये नफ्याच्या संधी पाहत खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ही कंपनी मुख्यतः पॉलिस्टीरिन तयार करते, जे डिस्पोजेबल प्लास्टिक कटलरी आणि डिनरवेअर, सीडी ज्वेल केस, स्मोक डिटेक्टर, हाउसिंग, लायसन्स प्लेट फ्रेम्स, प्लास्टिक मॉडेल असेंब्ली किट्स, बनवण्यासाठी वापरले जातात. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Supreme Petrochem Share Price | Supreme Petrochem Stock Price | BSE 500405 | NSE SPLPETRO)

व्यापार वृध्दी :
वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने आपली उत्पादन क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर पुढील काळात वाढतील असे तज्ञांना वाटते. ब्रोकरेज फर्म ‘KR Choksey’ ने अंदाज व्यक्त केला आहे की, आर्थिक वर्ष 2022-24 पर्यंत कंपनीचा महसूल 11.3 टक्के वाढेल आणि कंपनीला चक्रवाढ वार्षिक वाढ दर नुसार 10 टक्के अधिक निव्वळ नफा होईल. डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये कमकुवत कामगिरी केल्यामुळे या कंपनीने आर्थिक वर्ष 2023 आणि आर्थिक वर्ष 2024 च्या कमाईच्या अंदाजात कपात केली आहे. तथापि कंपनीच्या व्यवसायाची भक्कम वाढ पाहता तज्ञांनी या स्टॉकवर 427 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.

मल्टीबॅगर परतावा :
‘सुप्रीम पेट्रोकेम’ कंपनीचे शेअर्स 15 फेब्रुवारी 2002 रोजी 2.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 372.50 रुपये किमतीवर पोहचला आहे. म्हणजे मागील 21 वर्षात या स्टॉकने अवघ्या 69 हजार रुपयांवर एक कोटी रुपये परतावा मिळवून दिला आहे. मागील वर्षी 21 फेब्रुवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 315 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यानंतर एकाच महिन्यात म्हणजेच 28 मार्च 2022 पर्यंत स्टॉकने 53 टक्क्यांची उसळी घेतली आणि शेअर 513.53 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर पोहचला. इतकी वाढ झाल्यावर थोडा फार प्रॉफिट बुकींग तर होणारच, त्या अनुषंगाने स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि शेअरची किंमत 29 टक्के खाली आली. आता मात्र त्यात रिकव्हरी होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Supreme Petrochem Share Price 500405 SPLPETRO stock market live on 22 February 2023.

हॅशटॅग्स

Supreme Petrochem Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x