4 May 2024 10:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Zomato Share Price | 100 रुपये पेक्षा स्वस्त असलेला झोमॅटो शेअर 50% परतावा देईल, टॉप ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला

Zomato Share Price

Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ‘झोमॅटो’ कंपनीच्या स्टॉकबाबत जागतिक ब्रोकरेज फर्म उत्साही पाहायला मिळत आहे. ‘झोमॅटो’ कंपनीने ‘Zomato Everyday’ ही नवीन सेवा सुरू केली असून त्याला ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना घरगुती शिजवलेले खाद्यपदार्थ डिलिव्हर केले जातील. ‘झोमॅटो’ कंपनीच्या या सेवेमुळे कंपनीची ऑर्डर बुक वाढले असे ब्रोकरेज हाऊसेस म्हणत आहेत. जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनली आणि सिटी ग्रुपने ‘झोमॅटो’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकने आपल्या सर्वकालीन नीचांक पातळी किमतीवरून 35 टक्के रिकव्हरी केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zomato Share Price | Zomato Stock Price | BSE 543320 | NSE ZOMATO)

50 टक्के वाढ अपेक्षित :
मॉर्गन स्टॅनली फर्मने ‘झोमॅटो’ स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग कायम ठेवली आहे. यासोबतच तज्ञांनी ‘झोमॅटो’ स्टॉकवर प्रति शेअर लक्ष्य किंमत 82 रुपये निश्चित केली आहे. 23 फेब्रुवारी 2023 रोजी ‘झोमॅटो’ स्टॉक 55 रुपये किमतीवर बंद झाला होता. अशाप्रकारे, सध्याच्या किंमतीपासून स्टॉकमध्ये 50 टक्क्यांची वाढ होऊ शकते, असे तज्ञ म्हणतात. सिटी ग्रुपने झोमॅटो कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला असून त्यासाठी 76 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

ब्रोकरेज फर्मचे मत :
मॉर्गन स्टॅनले फर्मचे तज्ञ म्हणतात की, ‘झोमॅटो’ कंपनीने ‘Zomato Everyday’ ही नवीन सेवा सुरू केली केली असून त्याला ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. या स्कीममध्ये खाद्यपदार्थांची सुरुवात 89 रुपये किमतीपासून होते. या नवीन सेवेमुळे ‘झोमॅटो’ कंपनीचे एकूण अॅड्रेसेबल मार्केट वाढेल, आणि कंपनीचा प्रति ऑर्डर नफा देखील वाढले, अशी अपेक्षा तज्ञांनी व्यक्त केली आहे. या नवीन सेवेमुळे कंपनीला फायदा होईल असे तज्ञ म्हणतात. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, ‘झोमॅटो एव्हरीडे’ या सेवे अंतर्गत कंपनी आपल्या ग्राहकांना घरगुती अन्न डिलिव्हरी करणार आहे. सुरुवातीला कंपनीने ही सेवा फक्त गुरुग्राम शहरामध्ये चालू केली आहे. ‘झोमॅटो’ कंपनी तर्फे ‘झोमॅटो एव्हरीडे’ सेवा सकाळी 8.30 ते 11.30 पर्यंत नाश्त्यासाठी आणि 11.30 ते 3.30 पर्यंत रात्रीच्या जेवणासाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

झोमॅटो कंपनीचे शेअर्स 23 जुलै 2021 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. आपल्या IPO मध्ये कंपनीने शेअरची इश्यू किंमत 76 रुपये प्रति शेअर जाहीर केली होती. तर स्टॉक 115 रुलये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. लिस्टिंगच्या दिवशी शेअरची किंमत 66 टक्क्यांच्या प्रीमियमसह 126 रुपयांवर क्लोज झाली होती. स्टॉक सूचीबद्ध झाल्यानंतर 16 नोव्हेंबर 2021 रोजी 169 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचला होता. मात्र, त्यानंतर स्टॉकमध्ये पडझड झाली आणि शेअर 27 जुलै 2022 रोजी 40.60 रुपयांवर आला होता. 2023 या वर्षात स्टॉक आतापर्यंत 9 टक्क्यांनी घसरला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price 543320 stock market live on 25 February 2023.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(67)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x