18 May 2024 11:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | अवघ्या 2 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे 8 पट वाढवणारा IPO शेअर, खरेदी करणार?

PNGS Gargi Fashion Jewellery Share Price

PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | ‘पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी’ या रत्न आणि दागिन्यांचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 9.92 टक्के वाढले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 114.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 500 टक्के परतावा मिळवून दिला आहे. पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचा IPO डिसेंबर 2022 मध्ये 30 रुपये प्राइस बँडवर लॉन्च करण्यात आला होता. 20 डिसेंबर 202 रोजी बीएसई SME इंडेक्सवर या कंपनीचे शेअर्स 100 टक्के प्रीमियमसह सूचीबद्ध झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | PNGS Gargi Fashion Jewellery Stock Price | BSE 543709)

कंपनीच्या IPO ची कामगिरी :
पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचे शेअर्स 100 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते. पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीने डिसेंबर 2022 या महिन्यात 30 रुपये प्रति शेअर या किमतीवर IPO लाँच केला होता. या दरम्यान कंपनीचा IPO 230.84 पट सबस्क्राईब झाला होता .PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 248.68 पट सबस्क्राईब झाला होता. पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचे शेअर्स बीएसई SME इंडेक्सवर 20 डिसेंबर 2022 रोजी 57 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले, आणि पहिल्याच दिवशी शेअरची किंमत 59.85 रुपयांवर पोहोचली होती. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी जवळजवळ 100 टक्के लिस्टिंग प्रॉफिट कमावला होता.

शेअरची कामगिरी :
पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने जानेवारी 2022 च्या सुरुवातीस सलग पाच ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटला हिट केला होता. नंतर हा स्टॉक 2 फेब्रुवारी 2023 रोजी 201.15 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला होता. म्हणजेच जर तुम्ही लिस्टिंगच्या दिवशी या कंपनीचे स्टॉक खरेदी केले असते तर तुम्हाला 2 फेब्रुवारी 2023 पर्यंत 4 पट नफा मिळाला असता. कंपनीने एका लॉटमध्ये 4,000 शेअर्स जारी केले होते. यासाठी गुंतवणूकदारांना 1 लाख 20 हजार रुपये गुंतवणूक करावे लागले होते. आणि 2 फेब्रुवारी 2023 या गुंतवणुकीचे मूल्य 8 लाखांहून अधिक झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : PNGS Gargi Fashion Jewellery Share Price 543709 stock market live on 02 March 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x