16 May 2024 12:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टेक्निकल सेटअपवर टाटा पॉवर स्टॉक मजबूत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांसाठी खुशखबर! FD व्याजदर वाढले, किती फायदा होणार पटापट तपासून घ्या SBI Mutual Fund | पगारातून बचत करा! SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' योजना मालामाल करतील, बचत अवघी रु. 500 Post Office Scheme | मोठी कमाई करा! या योजनेत 500 रुपयांची बचत सुरु करा, मिळेल 9,76,370 रुपये परतावा Income Tax Returns | पगारदारांनो! तुमचा पगार इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नसेल तरी ITR करा, मिळतील 'हे' फायदे Nippon India Mutual Fund | बँक FD पेक्षा नोकरदार वर्ग या फंडात पैसे गुंतवतो, लो-रिस्क आणि फायदा मोठा मिळतोय Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये मोठ्या हालचाली होणार? SBI बँकेचा निर्णय ठरणार महत्वाचा, काय आहे बातमी?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price|  SBI ही भारतातील सर्वात मोठी सरकारी मालकीची बँक आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने येस बँक मध्ये मोठी गुंतवणुक केली होती, आणि त्याचा लॉक इन कालावधी 6 मार्च 2023 रोजी संपणार आहे. लॉक इन कालावधी संपल्यानंतर SBI बँक आपले येस बँकेतील भाग भांडवल विकू शकते. एसबीआय बँकला येस बँकेत कायमस्वरूपी गुंतवणूक करायची नाही, म्हणून SBI आपले भाग भांडवल कमी करु शकते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)

SBI ने धारण केले 26.14 टक्के भाग भांडवल :
स्टॉक एक्स्चेंज डेटा पाहिल्यास आपल्या समजेल की, SBI ने 31 डिसेंबर 2022 पर्यंत येस बँकेचे 26.14 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. एसबीआय बँक ही येस बँकेमधील सर्वात मोठी शेअरहोल्डर बनली आहे. जेव्हा येस बँक संकटातून जात होती, तेव्हा एसबीआयने येस बँकेचे 49 टक्के भाग भांडवल खरेदी करून तिला वाचवले होते. पुनर्रचना योजनेनुसार भांडवल ओतण्याच्या तारखेपासून तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वी एसबीआय आपले शेअर होल्डिंग कमी करू शकत नाही, असा नियम होता. आता मात्र हा लॉक इन कालावधी संपत आला आहे, आणि SBI आपले भाग भांडवल विकून येस बँकमधून बाहेर पडू शकते.

येस बँकेच्या शेअरची कामगिरी :
शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 1.14 टक्के घसरणीसह 17.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये येस बँकेने म्हटले होते की, शेअरचा लॉक इन कालावधी संपल्यानंतरच आरबीआय पुनर्रचना योजनेतून बाहेर पडण्याची परवानगी देईल. त्यावेळी एसबीआय, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, कोटक महिंद्रा बँक, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्प, यासारख्या दिग्गज संस्थांनी आणि कर्जदारांनी येस बँकेचे भाग भांडवल खरेदी केले होते. त्या वेळी RBI ने तयार केलेल्या पुनर्रचना योजनेनुसार या कर्जदारांनी तीन वर्षांसाठी किमान 75 टक्के होल्ड करणे आवश्यक होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : YES Bank Share Price 532648 YESBANK stock market live on 03 March 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x