18 May 2024 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या
x

Multibagger Stocks | एका होळीपासून ते पुढच्या होळीपर्यंत जबरदस्त परतावा देणारे 5 शेअर्स, 300% पर्यंत परतावा मिळतोय

Multibagger Stock

Multibagger Stocks | मागील वर्षाच्या होळीपासून या होळीपर्यंत बीएसई सेन्सेक्स इंडेक्सने 14 टक्के वाढ नोंदवली आहे, तर निफ्टी-50 नेही 11.65 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. 2022 पासून आतापर्यंत शेअर बाजारात अनेक मल्टीबॅगर स्टॉक आले आणि गेले. या शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांनी वर्षभरातच मजबूत नफा कमावला. आज या लेखात आम्ही तुम्हाला 5 मल्टीबॅगर स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्के परतावा मिळवून दिला आहे. दरम्यानच्या काळात शेअर मार्केटला लागलेल्या धक्क्यांचा या शेअर्सवर काहीही परिणाम झाला नाही.

अपार इंडस्ट्रीज :
या कंपनीच्या शेअरने एका वर्षभरात लोकांचे पैसे साडेतीन पट वाढवले आहेत. एक वर्षभरापूर्वी या कंपनीचे शेअर्स 600 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी हा स्टॉक 1.89 टक्के घसरणीसह 2,276.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने लोकांना 300 टक्के.परतावा मिळवून दिला आहे.

Mazagon डॉक शिपबिल्डर्स :
या कंपनीच्या स्टॉकने मागील 1 वर्षात आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत या स्टॉकची किंमत 200 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. स्टॉक एका वर्षात 240 रुपयांवरून वाढून 744.20 रुपयांवर पोहचला आहे.

युको बँक :
या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मागील एका वर्षभरात मजबूत परतावा मिळवून दिला आहे. मागील होळीपासून आतापर्यंत या बँकिंग शेअरची किंमत जवळपास अडीच पट वाढली आहे. एक वर्षभरापूर्वी युको बँक शेअर 11.50 रुपयांवर ट्रेड करत होता. तो आता वाढून व्यवहार करणारा युको बँकेचा शेअर आता 26.95 रुपये किमतीवर आला आहे.

इंडियन बँक :
या बँकिंग शेअरमध्ये मागील वर्षभरात 115 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 1 वर्षापूर्वी इंडियन बँक शेअर 130 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी या स्टॉक 0.38 टक्के वाढीसह 287.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या स्टॉक ने गुंतवणूकदारांचे पैसे एका वर्षात दुप्पट केले आहे.

रेल विकास निगम लिमिटेड :
या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकाचे पैसे एका वर्षात दुप्पट झाले आहे. एक वर्षभरापूर्वी RVNL कंपनीचे शेअर्स 30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी या स्टॉक 1.76 टक्के घसरणीसह 64.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात या मल्टीबॅगर स्टॉकने लोकांना 115 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks has given huge returns in one year check details on 08 March 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x