29 April 2024 3:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

Olectra Greentech Share Price | सुपर से उपर स्टॉक! 2388 टक्के परतावा, हा शेअर तुफानी वेगात वाढत आहे, खरेदी करावा?

Olectra Greentech Share Price

Olectra Greentech Share Price | ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ या इलेक्ट्रिक बस निर्मात्या कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किट वर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.57 टक्के वाढीसह 708.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील पाच दिवसांत ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे शेअर्स 34.31 टक्के वाढले आहेत. वास्तविक कंपनीला इलेक्ट्रिक बसेसच्या पुरवठ्याची मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 1,000 कोटी रुपये आहे.

550 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर :
‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीला ‘तेलंगणा स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’ म्हणजेच TSRTC कडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. कंपनीने सांगितले की Avee Trans Pvt Ltd कंपनीला 550 इलेक्ट्रिक बसेससाठी TSRTC कडून दोन LOA prapt झाले आहेत. यामध्ये इंट्रासिटी 500 बसेस आणि इंटरसिटी 50 बसेसचा समावेश आहे. या डीलनुसार कंपनीला पुढील 12 वर्षांत 500 इलेक्ट्रिक बसेस आणि 10 वर्षांत 50 इलेक्ट्रिक बसेस पुरवायच्या आहेत. ही डील ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट/Opex मॉडेलच्या आधारे केली जाईल. EVEY फर्म या सर्व बसेस ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कडून खरेदी करेल ज्या 16 महिन्यांत वितरित केल्या जातील.

स्टॉकची कामगिरी :
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्समध्ये शानदार तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे शेअर्स 51.59 टक्के वाढले आहेत. मागील सहा महिन्यात या कंपनीचे शेअर्स फक्त 13.13 टक्के वाढले आहेत. 2023 या वर्षात आतापर्यंत शेअर्सची किंमत 30 टक्क्यांनी वाढली आहे. त्याच वेळी दीर्घ मुदतीतही गुंतवणूकदारांनी बंपर नफा कमावला आहे. मागील 20 वर्षात ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे शेअर्स 2,388.35 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याच वेळी, मागील 5 वर्षांत ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 243.19 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीने नुकताच ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ सोबतच्या तांत्रिक भागीदारीत पहिली हायड्रोजनवर चालणारी बस लाँच केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Olectra Greentech Share Price return on investment on 11 March 2023.

हॅशटॅग्स

Olectra Greentech Share Price(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x