27 April 2024 2:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

IFL Enterprises Share Price | ही कंपनी गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा देणार, कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सची घोषणा

IFL Enterprises Share Price

IFL Enterprises Share Price| ‘आयएफएल एंटरप्रायझेस’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ देण्याची घोषणा केली आहे. आज शुक्रवार दिनाक 31 मार्च 2023 रोजी ‘आयएफएल एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स 4.85 टक्के वाढीसह 161.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (IFL Enterprises Limited)

कंपनीची घोषणा :
सेबीला दिलेल्या माहितीत ‘आयएफएल एंटरप्रायझेस’ कंपनीने म्हटले आहे की, कंपनीच्या संचालकांनी 30 मार्च 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत स्टॉक विभाजनाची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. या स्टॉक विभाजन अंतर्गत कंपनी 1 शेअर 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. यासाठी कंपनीने 21 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. याशिवाय कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस इक्विटी शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 4 शेअर्सवर एक बोनस शेअर मोफत देणार आहे.

‘आयएफएल एंटरप्रायझेस’ शेअर किंमत इतिहास :
‘आयएफएल एंटरप्रायझेस’ कंपनीच्या शेअरने मागील पाच वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 3,470.95 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन वर्षात गुंतवणूकदारांनी या स्टॉकमधून 1,817.60 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा कमावला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 728.02 टक्के मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. YTD आधारे या स्टॉकने लोकांना एका वर्षात 13.82 टक्के नफा कमावून दिला आहे. ‘आयएफएल एंटरप्रायझेस’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 187.20 रुपये होती. सध्या हा स्टॉक आपल्या 1 वर्षाच्या उच्चांक किंमतीपेक्षा 17.94 टक्के खाली ट्रेड करत आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘आयएफएल एंटरप्रायझेस’ ही दिल्ली स्थित कंपनी पेपर ट्रेडिंग क्षेत्रात उद्योग करते. कंपनी मुख्यतः कॉर्पोरेशन बाँड्स, स्टॉक्स आणि इतर वित्त साधनांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायात काम करते. यासोबतच कंपनी विविध प्रकारचे कागद आणि संबंधित वस्तूंचे वितरण करण्याचे काम करते. ‘आयएफएल एंटरप्रायझेस’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 279.43 कोटी रुपये आहे.

कंपनीचे तिमाही निकाल :
IFL Enterprises ‘ कंपनीने डिसेंबर 2022 च्या तिमाहीत 0.15 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीला 2.36 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. एका वर्षभरात ही कंपनी तोट्यातून नफ्यात आली आहे. Q3FY23 मध्ये कंपनीने 0.50 कोटी रुपये ऑपरेशनल महसूल संकलित केला होता. Q3FY22 मध्ये कंपनीचा महसूल 0.57 कोटी रुपये होता. IFL एंटरप्रायझेस कंपनीचा EPS आर्थिक वर्ष 2022 च्या त्याच तिमाहीत 7.87 कोटी तोट्याच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2023 Q3 मध्ये 0.08 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IFL Enterprises Share Price on 31 March 2023.

हॅशटॅग्स

IFL Enterprises Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x