28 April 2024 8:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

चिन्हामुळे लॉटरी! ५०,००० रेडिमेड कार्यकर्ते व मतदानाच्या दिवशी सुद्धा चिन्ह डोळ्यासमोर असेल

MLA Hitendra Thakur, Palghar Loksabha 2019, Shivsena, BJP

पालघर : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर पालघर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना आणि भाजप युतीच्या मंत्र्यांनी रडीचा डाव खेळत बहुजन विकास आघाडीच्या चिन्हावरच निवडणूक आयोगामार्फत अडथळे आणले आणि ते यशस्वी झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने बहुजन विकास आघाडीचे पूर्वीचे ‘शिट्टी’ हे चिन्हं गोठवून त्यांना ‘ऑटो-रिक्षा’ हे नवीन निवडणूक चिन्ह बहाल केलं आहे.

मात्र शिवसेनेची ही आयत्यावेळी केली गेलेली निवडणूक नीती त्यांच्याच तोट्याची आणि बहुजन विकास आघाडीच्या फायद्याची ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील ऑटो-रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे त्यांची संख्या लक्षात घेता बहुजन विकास आघाडीला या चिन्हामुळे तब्बल ५०,००० कार्यकर्ते मिळाले आहेत.

विशेष म्हणजे निवडणूक आयोगाच्या नियमांचा अभ्यास केल्यास म्हणजे प्रचार सभांचा कार्यकाळ संपल्यावर आणि मतदानाच्या २ दिवस आधी आणि अगदी मतदानाच्या दिवशी कोणत्याही पक्षाला स्वतःच्या निवडणूक चिन्हाचा प्रसार किंवा जाहिरात करण्यावर बंदी असते. मात्र बहुजन विकास आघाडीला देण्यात आलेलं ‘ऑटो-रिक्षा’ हे निवडणूक चिन्ह मतदानाच्या दिवशी देखील मतदाराच्या डोळ्यासमोर असणार आहे. कारण त्यादिवशी स्वतः निवडणूक आयोग देखील सामान्य लोकांच्या प्रवासाच्या या साधनावर बंदी घालू शकत नाही तसेच थेट मतदान केंद्रापर्यंत ऑटो रिक्षातून प्रवास करण्यावाचून रोखू देखील शकत नाही. त्यामुळे जुन्या ‘शिट्टी’ या चिन्हांपेक्षा ही ‘ऑटो-रिक्षा’ हे निवडणूक चिन्ह बहुजन विकास आघाडीची अधिक फलदायी ठरण्याची शक्यता जाहिरात तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

तसेच यापूर्वी बहुजन विकास आघाडीला इतर निवडणूक चिन्हांवर निवडणूक लढविण्याचा पूर्व अनुभव आहे याचा देखील शिवसेना आणि भाजपला विसर पडला होता. मात्र त्यांनी आयत्यावेळी केलेली खेळी बहुजन विकास आघाडीच्या पथ्यावर पडल्याचं मत अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. कारण इंटरनेट, टीव्ही आणि समाज माध्यमांच्या युगात ते अधिकच सोपं झालं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच जिल्ह्यात जेवढी चर्चा कधी शिट्टी या चिन्हाची झाली नव्हती, त्यापेक्षा अधिक चर्चा ‘ऑटो-रिक्षा’बद्दल रंगल्याचे पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे काहीच न करता देखील जोरदार प्रचार सुरु झाला आहे असंच काहीच चित्र सध्या पालघरमध्ये पाहायला मिळत आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x