18 May 2024 1:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा
x

AU Small Finance Bank Share Price | एक बातमी येताच हा बँकिंग स्टॉक तेजीत आला, 1 दिवसात दिला FD पेक्षा तिप्पट परतावा

AU Small Finance Bank Share Price

AU Small Finance Bank Share Price | ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’ च्या शेअरने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 17 टक्के उसळी घेतली होती. आणि दिवसाखेर स्टॉक 16.57 टक्के वाढीसह 676.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्याशी संबंधित एक बातमीमुळे ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’ च्या शेअर्समध्ये अचानक वाढ पाहायला मिळाली होती. वास्तविक रिझर्व्ह बँकेने ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’ चे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक आणि CEO ‘संजय अग्रवाल’ यांना देण्यात आलेल्या 3 वर्षांचा मुदतवाढीला मान्यता दिली आहे. (AU Small Finance Bank Limited)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’ च्या व्यवस्थापकीय संचालक आणि CEO ‘संजय अग्रवाल’ यांची 16 एप्रिल 2023 ते 18 एप्रिल 2026 पर्यंत 3 वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय ‘उत्तम टिब्रेवाल’ यांची पुढील 3 वर्षांच्या कालावधीसाठी बँकेचे पूर्णवेळ संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करण्यासही मंजुरी दिली आहे. इतर काही बँकांच्या बाबतीतही रिझर्व्ह बँकेने केवळ 2 वर्षांसाठी उच्च अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीला मंजुरी दिली आहे. अशा स्थितीत ‘AU स्मॉल फायनान्स बँक’ साठी ही बातमी सकारात्मक आहे.

शेअरची कामगिरी :
‘AU स्मॉल फायनान्स बँक’ च्या शेअर्सनी मागील 5 दिवसात आपल्या गुंतवणुकदारांना सुमारे 21.42 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 एप्रिल 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 557.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 13 एप्रिल 2023 रोजी ‘AU स्मॉल फायनान्स बँक’ चे शेअर्स 682 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’ च्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 732.90 रुपये होती. त्याच वेळी ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’ शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 538.80 रुपये होती. मागील 5 वर्षात ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’ च्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 106.83 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | AU Small Finance Bank Share Price on 14 April 2023.

हॅशटॅग्स

#AU Small Finance Bank Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x