19 May 2024 7:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Surya Roshni Share Price | घरा-घरात प्रकाश देणाऱ्या 'सूर्या बल्प'चे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर सिद्ध झाले

Surya Roshni Share Price

Surya Roshni Share Price | गुरुवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी ‘सूर्या रोशनी’ कंपनीचे शेअर्स 3.85 टक्के वाढीसह 753.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 755 रुपये होती. वास्तविक, कंपनीची आर्थिक कामगिरी आणि कंपनीचा व्यापार वाढीचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. पुढील आर्थिक वर्षात कंपनीच्या आर्थिक कामगिरी आणि व्यापारात सुधारणा होण्याची शक्यता आहे. यामुळेच शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. (Surya Roshni Limited)

कंपनीची आर्थिक कामगिरी :
आर्थिक वर्ष 2022 मध्ये वार्षिक आधारावर कंपनीच्या महसुलात 39 टक्के वाढ पाहायला मिळाली. आर्थिक वर्ष 2022-23 च्या सुरुवातीच्या नऊ महिन्यात म्हणजेच एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत कंपनीची कामगिरी सातत्याने सुधारली आहे. या दरम्यान कंपनीच्या महसुलात वार्षिक 8 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. स्थिर इनपुट खर्च, सणासुदीचा हंगाम आणि उत्पादनांच्या मिश्रणात सतत सुधारणा यामुळे कंपनीची आर्थिक कामगिरी कमालीची वाढली आहे. कंपनी सर्व व्यवसाय विभागात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेअर टार्गेट प्राईस :
आनंद राठी फर्मने सूर्या रोशनी कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकसाठी 860 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 753.50 रुपयेवरून 14 टक्के अधिक वाढू शकतात.

स्टॉकची कामगिरी :
‘सूर्या रोशनी’ कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 13.95 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 62.64 टक्के नफा कमावून दिला आहे. ‘सूर्या रोशनी’ कंपनीच्या शेअर्सची किंमत एका वर्षात 68.40 टक्के वाढली आहे. मागील 3 वर्षांत हा स्टॉक 987 टक्के वाढला आहे.

कंपनीचा व्यवसाय :
‘सूर्या रोशनी’ कंपनी मुख्यतः स्टील पाईप्स आणि स्ट्रिप्स, लाइटिंग आणि कंझ्युमर ड्युरेबल्स सेगमेंट मध्ये उत्पादन आणि वितरण व्यवसाय करते. स्टील पाईप्स आणि स्ट्रिप्स विभागातील सर्व उत्पादने ‘प्रकाश सूर्या ब्रँड’ या नावाने विकले जातात. त्याच वेळी ‘सूर्या’ ब्रँड अंतर्गत लाईट आणि ग्राहक टिकाऊ वस्तू विभागातील वस्तू जसे की सर्व प्रकारचे दिवे, घरगुती विजेरी उपकरणे, पीव्हीसी पाईप्स विकले जातात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Surya Roshni Share Price on 14 April 2023.

हॅशटॅग्स

Surya Roshni Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x