12 May 2024 11:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

Medico Remedies Share Price | परतावा मिळावा तर असा! 2300% परताव्यासह बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसह बरच काही

Medico Remedies Share Price

Medico Remedies Share Price | ‘मेडिको रेमेडीज’ या फार्मा क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. शेअर धारक अक्षरशः आश्चर्यचकित झाले आहेत. ‘मेडिको रेमेडीज’ या कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने मागील तीन वर्षांच्या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 2300 टक्के परतावा मिळवून दिला आहे. सध्या हा स्टॉक 90 रुपयांपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे. गुरुवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 1.16 टक्के वाढीसह 87.92 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Medico Remedies Limited)

गुंतवणुकीवर परतावा :
‘मेडिको रेमेडीज’ कंपनीच्या शेअरने मागील एका आठवड्यात आपल्या किरकोळ गुंतवणूकदारांना 9.30 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील दोन आठवड्यांत या कंपनीचे शेअर्स 18.65 टक्के वाढले आहेत. मागील.एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 13.78 टक्के आणि मागील तीन महिन्यांत 34.60 टक्के वधारले होते. गेल्या सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 212 टक्के आणि मागील 1 वर्षात 450 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या स्टॉकने लोकांना 1660 टक्के आणि मागील तीन वर्षांत 2300 टक्के परतावा कमावून दिला आहे.

2023 या वर्षात मार्च 2023 मध्ये ‘मेडिको रेमेडीज’ कंपनीचे शेअर्स विभाजित करण्यात आले होते. केला मेडिको रेमेडीज कंपनीचे शेअर्स 1:2 या प्रमाणात विभाजित करण्यात आले होते. यापूर्वी ‘मेडिको रेमेडीज’ कंपनीने नोव्हेंबर 2021 मध्ये आपल्या शेअर धारकांना 3:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप केले होते.

मुंबई स्थित ‘मेडिको रेमेडीज’ कंपनी फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात व्यापार करते. कंपनी अँटी इन्फेक्टीव्ह, बीटा लॅक्टम्सवर लक्ष केंद्रित करून फॉर्म्युलेशनचे उत्पादन आणि विपणन करण्याचे काम करते. ही कंपनी प्रतिजैविक, जीवनसत्त्वे, सप्लिमेंट्स, अँटी अल्सर औषधे, ड्राय सिरप, कॅप्सूल, मलम, क्रीम यांसारखे औषध उत्पादने बनवण्याचे काम करते. ‘मेडिको रेमेडीज’ या कंपनीचा व्यवसाय जगभरातील 35 पेक्षा जास्त देशांमध्ये विस्तारला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Medico Remedies Share Price on 15 April 2023.

हॅशटॅग्स

Medico Remedies Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x