15 May 2024 7:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Tata Technologies IPO | टाटा तिथे नो घाटा! बऱ्याच प्रतीक्षेनंतर टाटा ग्रुपच्या कंपनीचा IPO लाँच होतोय, संधी सोडू नका, IPO तपशील वाचा

Tata Technologies IPO

Tata Technologies IPO | IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना एक जबरदस्त संधी मिळणार आहे. हा IPO आहे, टाटा समूहाचा. ‘टाटा मोटर्स’ ची उपकंपनी ‘टाटा टेक्नॉलॉजी’ लवकरच आपला IPO लाँच करणार आहे. कंपनीने IPO साठी SEBI कडे DRHP मसुदा देखील सबमिट केला आहे. DRHP नुसार ‘टाटा मोटर्स’ कंपनी आपल्या उप कंपनी ‘टाटा टेक्नॉलॉजी’ मधील 8,11,33,706 शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. टाटा मोटर्स कंपनीने ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर 7.40 रुपये किमतीने खरेदी केले होते. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत तेजीत वाढत आहे. (Tata Technologies Limited)

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे बाजार मूल्य 18,000 ते ₹ 20,000 कोटी रुपये आहे. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या आयपीओबाबत ग्रे मार्केटमधील तज्ञ देखील उत्साही आहेत. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 830 रुपये प्रति शेअर असू शकते. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या IPO स्टॉकची अंतिम किंमत अजून ठरलेली नाही. मात्र ग्रे मार्केट मधून या कंपनीच्या शेअरबाबत सकारात्मक प्रतिसाद येत असून या वरून कळते की, गुंतवणूकदार या IPO ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनी IPO साठी शेअरची जी किंमत ठरवेल ती आपल्या अंदाजापेक्षा कमी देखील असू शकते. कंपनी आपल्या शेअर बाजारातील मूल्यांकन गणणेसाठी KPIT Tech आणि Tata Elxsi सारख्या जवळच्या सहयोगी कंपनी सोबत तुलना करु शकते.

आपल्या स्पर्धक कंपन्याचे वर्तमान P / E, आणि इतर काही घटक विचारात घेतले जाऊ शकतात. स्पर्धक कंपन्यांसोबत तुळणार केल्यास ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या IPO शेअरची किंमत 700 ते 880 रुपये दरम्यान अशी शकते. IPO मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी मजबूत फायदा मिळवता येऊ शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies IPO is going to launch soon for investment check details on 18 April 2023.

हॅशटॅग्स

#Tata Technologies IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x