17 May 2024 3:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक 'हाय रिस्क' वर, तज्ज्ञांचा Sell करण्याचा सल्ला, किती घसरणार?
x

TTK Healthcare Share Price Today | हेल्थकेअर सेक्टरमधील कंपनी डीलिस्टेड होणार, गुंतवणुकदारांवर काय परिणाम होणार?

TTK Healthcare Share Price

TTK Healthcare Share Price Today | ‘टीटीके हेल्थकेअर’ कंपनी शेअर बाजारातून डीलिस्ट होणार आहे. या आठवड्यात कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार असून त्यात डिलिस्टिंगच्या प्रस्तावावर विचार होणार आहे. गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देणारी कंपनी, अचानक शेअर बाजारातून बाहेर पडणार आहे, याने शेअर धारकांना नक्कीच धक्का बसला आहे. गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी कंपनीच्या कंपनीच्या बोर्डाची बैठक होणार आहे. (TTK Healthcare Limited)

दोन आठवड्यांपूर्वी दिग्गज गुंतवणुकदार सुनील सिंघानिया यांनी ‘टीटीके हेल्थकेअर’ कंपनीचे 1.74 टक्के भाग भांडवल खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. टीटीके हेल्थकेअर कंपनीने मागील वर्षी आपला फार्मा व्यवसाय दुसऱ्या कंपनीला विकला होता. गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.065 टक्के वाढीसह 1,309.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

TTK हेल्थकेअर कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमधून डिलिस्ट होण्यापूर्वी कंपनीला शेअर्सची किंमत निश्चित करावी लागली. SEBI च्या नियमांनुसार, एखाद्या कंपनीला शेअर बाजारातून बाहेर पडायचे असल्यास कंपनीला शेअर्सची किंमत मागील 26 आठवड्यांच्या सरासरी किमतीच्या आधारे निश्चित करावी लागेल.

5 एप्रिल 2023 पासून ‘टीटीके हेल्थकेअर’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. सुनील सिंघानिया यांनी गुंतवणूक केल्यापासून शेअरची किंमत 40 टक्क्यांनी वाढली आहे. टीटीके हेल्थकेअर कंपनीने मागील वर्षी आपला फार्मा व्यवसाय मुंबईस्थित ‘भारत सीरम्स अँड व्हॅक्सिन’ कंपनीला 805 कोटी रुपयांना विकुन टाकला होता.

कंपनीमध्ये गुंतवणूक हिस्सा :
‘टीटीके हेल्थकेअर’ कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 74.56 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. सार्वजनिक गुंतवणूकदारांनी 20 टक्के आणि परकीय गुंतवणूकदारांनी 2.99 टक्के, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2.38 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. अॅक्सिस म्युच्युअल फंडाने सुढे 2.08 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत. मात्र डिलिस्टिंगची प्रक्रिया तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा कंपनीमध्ये प्रवर्तकांकडे 90 टक्के शेअर्स असतील.

कंपनीचे प्रवर्तक टीटी जगन्नाथन यांनी कंपनीचे 5.37 टक्के, टीटी रघुनाथन 0.27 टक्के, शांती रघुनाथन 0.41 टक्के, भानू रघुनाथन 0.40 टक्के, लथा जगन्नाथन 0.21 टक्के, टीटी कृष्णमाचारी अँड कंपनी 67 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत. प्रवर्तकांच्या शेअरची संख्या 1 कोटींहून अधिक आहे. आणि कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,831 कोटी रुपये आहे.

स्टॉक डीलिस्टिंगचे कारण :
सहसा कंपन्या शेअर बाजारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात जेव्हा त्यांना वाटते की त्यांना इक्विटी मार्केटमधून मिळणारा नफा त्यांच्या ऑपरेशन मार्जिनपेक्षा खूप कमी आहे. TTK कंपनीच्या प्रवर्तकांनी माहिती दिली की, आम्ही फार्मा व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला, कारण बाजारातील उच्च स्पर्धेमुळे येथील मार्जिन सिंगल डिजिटपर्यंत खाली आले होते. आणि शेअर बाजारातून बाहेर पडल्यानंतर ‘टीटीके हेल्थकेअर’ कंपनी नवीन व्यवसाय आणि नवीन नियोजनानुसतं व्यवसाय वाढीवर काम करणार आहे.

डिलिस्टिंगमुळे गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार? :
सध्या ‘टीटीके हेल्थकेअर’ कंपनीची 20 टक्के शेअर होल्डिंग सार्वजनिक गुंतवणुकदारांकडे आहे. या किरकोळ गुंतवणूकदारांना याचा फटका बसू शकतो. मात्र ‘टीटीके हेल्थकेअर’ कंपनी आपल्या किरकोळ गुंतवणूकदारांना डीलिस्टिंग ऑफरद्वारे एक्झिट देण्याचा प्रयत्न करणार आहे. गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स चांगल्या किमतीत कंपनीला विकून बाहेर पडू शकतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTK Healthcare Share Price Today on 20 April 2023.

हॅशटॅग्स

TTK Healthcare Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x