15 May 2024 6:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Mankind Pharma IPO | काँडम बनवणाऱ्या फार्मा कंपनीचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, शेअर ग्रे मार्केट मध्ये धम्माल करतोय

Mankind Pharma IPO

Mankind Pharma IPO | विशेषतः IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छिणाऱ्या गुंतवणुकदारांना सुवर्ण संधी भेटली आहे. ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनी आपला IPO लवकरच बाजारात लाँच करणार आहे. मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. हा IPO 27 एप्रिल 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. (Mankind Pharma Limited)

‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीने 4326.36 कोटी रुपयेचा IPO ऑफर फॉर सेल अंतर्गत खुला केला आहे. ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनी आपल्या IPO शेअरची किंमत बँड 1026 रुपये ते 1080 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. कंपनी आपल्या IPO च्या एका लॉटमध्ये 13 शेअर्स जारी करणार आहे.

‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचा आयपीओ उद्या पासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीच्या शेअर्सला अद्भूत प्रतिसाद मिळत आहे. ग्रे मार्केटचा मागोवा घेणाऱ्या शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 90 रुपहे प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर मॅनकाइंड फार्मा कंपनीचे शेअर्स 1,080 रुपये अप्पर प्राइस बँडवर वाटप झाले, आणि ग्रे मार्केटमध्ये किंमत 90 रुपये प्रीमियमवर टिकुन राहिली तर हा स्टॉक 1,170 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो.

‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचे IPO शेअर्स 8 मे 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ शकतात. ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीच्या IPO शेअर्सचे वाटप 3 मे 2023 पर्यंत पूर्ण होतील. या कंपनीचे शेअर्स 8 मे 2023 रोजी BSE आणि NSE निर्देशांकावर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

किरकोळ गुंतवणूकदारांना मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या IPO मध्ये किमान 1 लॉटसाठी अर्ज करण्याची मुभा असेल. त्याच वेळी किरकोळ गुंतवणुकदार कमाल 14 लॉटसाठी अर्ज करू शकतात. 1 लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांना 14,040 रुपये जमा करावे लागतील. तर 14 लॉटसाठी गुंतवणूकदारांना 196,560 रुपये जमा करावे लागतील. मॅनकाइंड फार्मा कंपनीने वैद्यकीय प्रतिनिधींचे विस्तृत नेटवर्क निर्माण केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mankind Pharma Share Price Today on 24 April 2023.

हॅशटॅग्स

#Mankind Pharma IPO(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x