19 May 2024 3:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Larsen & Toubro Share Price | मालामाल करणारा 'लार्सन अँड टुब्रो' कंपनीचा शेअर पुन्हा तेजीत, शेअर डिटेल्स जाणून घ्या

Larsen & Toubro Share Price

Larsen & Toubro Share Price | ‘लार्सन अँड टुब्रो’ या अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल नुकताच जाहीर केले आहे. या तिमाहीत ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीने 10 टक्क्यांच्या वाढीसह 3,987 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मार्च 2022 च्या तिमाहीत ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीने 3,621 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीने जानेवारी 2022 च्या तिमाहीतील 52,851 कोटी रुपये महसुलाच्या तुलनेत जानेवारी 2023 च्या तिमाहीत 10 टक्क्यांच्या वाढीसह 58,335 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीने मार्च 2022 च्या तिमाहीतील 46,334 कोटी रुपयेच्या तुलनेत मार्च 2023 तिमाहीत 11 टक्क्यांच्या वाढीसह 51,502 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीचे शेअर्स 5.08 टक्के घसरणीसह 2,244.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

लाभांश वाटपाची शिफारस :
तिमाही निकालासोबत ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर 21 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीने 2,30,528 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळवल्या आहेत. वार्षिक आधारावर कंपनीच्या ऑर्डर प्राप्तीमध्ये 19 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

व्यवस्थापन मंडळात बदल :
‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीचे गैर-कार्यकारी अध्यक्ष एएम नाईक यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. यासोबतच ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, एसएन सुब्रमण्यन यांना कंपनीचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे.

सुब्रमण्यन ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त झाले होते. त्यांचा नवीन कार्यकाळ 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार एसएन सुब्रमण्यन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लार्सन अँड टुब्रो’ ही कंपनी आपल्या शेअर धारकांना उच्च मूल्य प्रदान करून देणारी बनून दाखवेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Larsen & Toubro Share Price today on 11 May 2023.

हॅशटॅग्स

Larsen & Toubro Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x