18 May 2024 2:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या
x

Bosch Share Price | बॉश लिमिटेड कंपनी भरघोस लाभांश देणार, गुंतवणूकदारांची झाली चांदी, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड तारीख पाहा

Bosch Share Price

Bosch Share Price | ‘बॉश लिमिटेड’ ही गृहोपयोगी उपकरणे, पॉवर टूल्स, ऑटो पार्ट्स बनवणारी कंपनी आपल्या शेअर धारकांना मोठा लाभ देणार आहे. 2022-23 या आर्थिक वर्षातील मार्च तिमाहीसाठी ‘बॉश लिमिटेड’ कंपनी आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 280 रुपये अंतिम लाभांश देणार आहे.

कंपनीने अंतिम लाभांशासाठी 14 जुलै 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. ‘बॉश लिमिटेड’ कंपनी 10 ऑगस्ट 2023 पर्यंत शेअर धारकांच्या खात्यात लाभांश जमा करेल. शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘बॉश लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 2.44 टक्के घसरणीसह 18,998.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

लाभांश तपशील :
‘बॉश लिमिटेड’ कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 साठी 480 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. यात 280 रुपये अंतिम लाभांश आणि 200 रुपये अंतरिम लाभांश असेल. बॉश लिमिटेड कंपनी ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा आणि इमारत तंत्रज्ञान, औद्योगिक तंत्रज्ञान आणि मोबिलिटी सोल्यूशन्स विभागांमध्ये तंत्रज्ञान सेवा प्रदान करण्याचे काम करते.

मागील एका वर्षात बॉश लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदाराना 45 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 13 मे 2022 रोजी 13098.70 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 12 मे 2023 रोजी 18998.95 हा स्टॉक रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीच्या तुलनेत ‘बॉश लिमिटेड’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात 13.45 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली आहे. मागील वर्षी मार्च तिमाहीत बॉश लिमिटेड कंपनीने 350.90 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीने 22.72 टक्के वाढीसह 4063.40 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाही कालावधीत कंपनीने 3311 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bosch Share Price today on 13 May 2023.

हॅशटॅग्स

Bosch Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x