1 May 2024 12:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

Lumax Industries Share Price | मालामाल शेअर! लुमॅक्स इंडस्ट्रीजच्या शेअरने 107 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला, प्लस 270 टक्के डिव्हीडंड

Highlights:

  • Lumax Industries Share Price
  • लुमॅक्स इंडस्ट्रीज शेअरची सध्याची किंमत
  • तिमाही निकाल तपशील
  • लुमॅक्स इंडस्ट्रीज शेअर स्थिती
Lumax Industries Share Price

Lumax Industries Share Price | ‘लुमॅक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीने नुकताच आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालासोबत कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुंतवणूकदारांना 27 रुपये लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव पारित केला आहे.

लुमॅक्स इंडस्ट्रीज शेअरची सध्याची किंमत

आज मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी लुमॅक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.07 टक्के वाढीसह 1,906.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑटोमोटिव्ह लाइटिंग व्यवसायात गुंतलेल्या लुमॅक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या ग्राहकांमध्ये मारुती, टाटा मोटर्स, हिरो, टोयोटा, टीव्हीएस सारख्या भारतीय दिग्गज ऑटो मोबाईल कंपन्यां सामील आहेत. सेबीला दिलेल्या माहितीत लुमॅक्स इंडस्ट्रीज कंपनीने सांगितले आहे की, कंपनी आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 27 रुपये लाभांश वाटप करणार आहे. यामुळे पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 270 टक्के लभांश मिळेल. लुमॅक्स इंडस्ट्रीज कंपनीने अद्याप लाभांशाची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही.

तिमाही निकाल तपशील

आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत लुमॅक्स इंडस्ट्रीज कंपनीने 608 कोटी रुपये महसूल संकलित केला हिता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 549 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत लुमॅक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा EBITDA 53 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मार्च 2022 च्या तुलनेत कंपनीच्या EBITDA मध्ये 12 टक्के घट नोंदवली गेली आहे. या काळात कंपनीचा EBITDA 61 कोटी रुपये होता.

लुमॅक्स इंडस्ट्रीज शेअर स्थिती

लुमॅक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.76 टक्क्यांच्या वाढीसह 2020.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. लुमॅक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2101.45 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 976.15 रुपये होती. सध्या हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीपासून 107 टक्के वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lumax Industries Share Price today on 30 May 2023.

हॅशटॅग्स

Lumax Industries Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x