6 May 2024 8:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार कोसळले, पटापट आजचे तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Highlights:

  • Gold Price Today
  • सोन्याचे दर पुढे खूप वाढणार?
  • आज सराफा बाजारात सोन्याचे दर घसरले
  • एमसीएक्सवर सोन्या-चांदीत घसरण
  • तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे बदललेले दर
Gold Price Today

Gold Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) आणि सराफा बाजारातही मंगळवारी घसरण पाहायला मिळाली. सोनं 60,000 रुपयांच्या विक्रमी पातळीच्या खाली जात आहे. जर तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हीच योग्य वेळ आहे. अशावेळी तुम्हाला कोणतेही सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्हाला याआधी पेक्षा नक्कीच कमी पैसे खर्च करावे लागतील.

सोन्याचे दर पुढे खूप वाढणार?

सध्या सुरू असलेल्या भावघसरणाच्या पार्श्वभूमीवर त्यात पुन्हा एकदा वाढ होईल, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यंदाच्या दिवाळीत सोने ६५,००० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे चांदी 80,000 रुपयांच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) आणि सराफा बाजारात मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. जाणून घेऊया आजचा दर..

आज सराफा बाजारात सोन्याचे दर घसरले

सराफा बाजाराच्या अधिकृत वेबसाइटनुसार, मंगळवारी सोने आणि चांदी 31 रुपयांनी घसरून 59,981 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 460 रुपयांनी घसरून 70323 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. सोन्याचे दर ६० हजार रुपयांच्या आकड्याच्या खाली पोहोचल्यानंतर बाजारात खरेदीदारांची गर्दी वाढली आहे.

एमसीएक्सवर सोन्या-चांदीत घसरण

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्सवर सोने 138 रुपयांनी घसरून 59361 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 570 रुपयांनी घसरून 70555 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेंड करत आहे. याआधी सोमवारी एमसीएक्सवर सोने 59499 रुपये आणि चांदी 71125 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे बदललेले दर

* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५५४५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४९० रुपये
* भिवंडी – २२ कॅरेट सोने : ५५४८० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०५२० रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५५४५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४९० रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 55480 रुपये, 24 कॅरेट सोने : 60520 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 55450 रुपये, 24 कॅरेट सोने : 60490 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५५४५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४९० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५५४८० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०५२० रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 55450 रुपये, 24 कॅरेट सोने : 60490 रुपये
* सोलापूर – 22 कॅरेट सोने : 55450 रुपये, 24 कॅरेट सोने : 60490 रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५५४८० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०५२० रुपये

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Price Today Updates check details on 30 May 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x