14 May 2024 12:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mobile Recharge Hike | बापरे! कोट्यवधी मोबाइल युजर्सना झटका लागणार! मोबाईल रिचार्ज खर्च 25% वाढणार Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, या 5 राशींसाठी पुढचे 17 दिवस अत्यंत लाभदायक, तुमची राशी कोणती? Mutual Fund SIP | पगारदारांची पसंती 'या' स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांना, नोकरदार वर्ग मालामाल होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! जुलैपासून बदलणार DA ची रक्कम, किमान वेतनात वाढ होणार RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

Hemant Surgical Industries IPO | आयपीओ गुंतवणुकीतून पैसा! या शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 76 टक्के परतावा मिळण्याचे संकेत

Highlights:

  • Hemant Surgical Industries IPO
  • हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज शेअरची ग्रे मार्केट कामगिरी
  • हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज IPO तपशील
Hemant Surgical Industries IPO

Hemant Surgical Industries IPO | ‘हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज’ कंपनीचा नुकताच गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या वैद्यकीय उपकरण व्यवसायाशी निगडीत कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचा IPO एकूण 139.70 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे.

हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO मधे रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 158 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. या कंपनीच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.

हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज शेअरची ग्रे मार्केट कामगिरी

हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज कंपनीचे आयपीओ स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 68 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या IPO स्टॉकची किंमत बँड 85-90 रुपये निश्चित करण्यात आली होती. जर ग्रे मार्केटमधील शेअरची 68 रुपये प्रीमियम किंमत टिकुन राहिली तर हा स्टॉक 158 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी 76 टक्के परतावा मिळू शकतो.

हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज IPO तपशील

हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स सोमवारी 5 जून 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ शकतात. गुंतवणूकदारांना IPO शेअर्सचे वाटप 31 मे 2023 रोजी केले जातील. किरकोळ गुंतवणूकदार हेमंत सर्जिकलच्या IPO मध्ये कमाल 2 लॉट खरेदी करू शकता.

कंपनीने आपल्या IPO मध्ये 1 लॉट अंतर्गत 1600 शेअर्स जारी केले आहेत. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 144,000 रुपये जमा करावे लागतील. हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO चा आकार 24.84 कोटी रुपये आहे. पब्लिक इश्यूनंतर हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज कंपनीमध्ये प्रमोटरकडे 73.56 टक्के भाग भांडवल शिल्लक राहील.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hemant Surgical Industries IPO today on 30 May 2023.

हॅशटॅग्स

Hemant Surgical Industries IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x