2 May 2024 2:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार?
x

Dhanuka Agritech Share Price | शेअर असावा तर असा! धानुका एग्रीटेक शेअरने 34000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, स्टॉक डिटेल्स

Highlights:

  • Dhanuka Agritech Share Price 
  • ब्रोकरेज फर्मचा खरेदी करण्याचा सल्ला दिला
  • शेअरने 34000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला
  • धानुका अॅग्रीटेक कंपनी शेअरचा ट्रेण्ड
  • कंपनीचा 25 टक्के कच्चा माल चीन आणि जपानमधून आयात केला जातो
Dhanuka Agritech Share Price

Dhanuka Agritech Share Price | शेअर बाजारात असे खूप कमी स्टॉक आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत करोडपती केले आहे. धानुका अॅग्रीटेक या अग्रगण्य कृषी रसायन निर्माता कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव असला तरी या कंपनीच्या शेअरने दीर्घ मुदतीत लोकांना करोडपती केले आहे. दीर्घ कालावधीत अवघ्या 34,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर धानुका अॅग्रीटेक कंपनीच्या शेअरने लोकांना करोडपती बनवले आहे.

ब्रोकरेज फर्मचा खरेदी करण्याचा सल्ला दिला

ब्रोकरेज फर्म अॅक्सिस डायरेक्टने या कंपनीचे शेअर्स बिनधास्त खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीपासून 11 टक्क्यांनी वाढू शकतो असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी धानुका अॅग्रीटेक शेअर 1.85 टक्के घसरणीसह 707.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शेअरने 34000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला

धानुका अग्रीटेक कंपनीचे शेअर्स 22 ऑगस्ट 2002 रोजी 2.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 29904 टक्क्यांच्या वाढीसह 707 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 20 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 300 पट वाढवले आहे. ज्या लोकांनी फक्त 34,000 रुपये लावले होते, ते लोक आता करोडपती झाले आहेत. मागील वर्षी 5 सप्टेंबर 2022 रोजी बीएसई इंडेक्स हा स्टॉक 748.90 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता.

धानुका अॅग्रीटेक कंपनी शेअरचा ट्रेण्ड

3 एप्रिल 2023 रोजी धानुका अॅग्रीटेक कंपनीचे शेअर्स 603.05 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र नंतर शेअर्समध्ये पुन्हा एकदा खरेदीचा ट्रेण्ड सुरू झाला आणि स्टॉक तेजीत आला. आतापर्यंत हा स्टॉक 19 टक्क्यांनी वाढला आहे. मात्र स्टॉक अजूनही वार्षिक उच्चांक किमतीच्या तुलनेत 4 टक्क्यांनी कमजोर आहे. मार्च 2023 तिमाहीत धानुका अॅग्रीटेक कंपनीची निव्वळ विक्री आणि निव्वळ नफा वार्षिक आधारावर 17 टक्क्यांनी वाढला आहे. दे

शांतर्गत ब्रोकरेज फर्म Axis Direct च्या मते, धानुका अॅग्रीटेक कंपनीकडे देशभरात पसरलेल्या 6500 हून अधिक वितरकांच्या नेटवर्कचा वापर करून अधिक लाभ घेण्याची कमालीची क्षमता आहे. याशिवाय ही कंपनी नवीन उत्पादने विकसित करण्यावरही लक्ष केंद्रीत करत आहे. मागील दोन वर्षांत कंपनीने सर्व विभागांमध्ये 8 नवीन उत्पादने लाँच केले आहेत.

कंपनीचा 25 टक्के कच्चा माल चीन आणि जपानमधून आयात केला जातो

धानुका अॅग्रीटेक कंपनीला नवीन उत्पादनांच्या विकासासाठी आणि कच्च्या मालासाठी परदेशी कंपन्यांवर अवलंबून असल्यामुळे आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे कंपनीचा 25 टक्के कच्चा माल चीन आणि जपानमधून आयात केला जातो. या सर्व कारणांमुळे ब्रोकरेज फर्मने धानुका अॅग्रीटेक कंपनीच्या स्टॉकवर 800 रुपये लक्ष्य निश्चित केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Dhanuka Agritech Share Price today on 01 June 2023.

हॅशटॅग्स

Dhanuka Agritech Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x