3 May 2024 11:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Mercury EV Tech Share Price | आजही शेअरची किंमत 25 रुपये, एका वर्षात 2,713 टक्के परतावा दिला, 1 लाखाचे झाले 27 लाख रुपये

Highlights:

  • Mercury EV Tech Share Price
  • मर्क्युरी इव्ही टेक शेअरची सध्याची किंमत
  • 110 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली
  • मागील एका वर्षभरात या शेअरने 2,713.27 टक्के परतावा दिला
Mercury EV Tech Share Price

Mercury EV Tech Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मल्टीबॅगर परतावा कमवू इच्छित असाल तर तुम्ही ‘मर्क्युरी इव्ही टेक’ कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बंपर कमाई करून दिली आहे. ‘मर्क्युरी इव्ही टेक’ ही कंपनी Mercury Metals Limited या नावाने ओळखली जात होती.

मर्क्युरी इव्ही टेक शेअरची सध्याची किंमत

‘मर्क्युरी इव्ही टेक’ ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती उद्योगात गुंतलेली आहे. 7 जून रोजी ‘मर्क्युरी इव्ही टेक’ कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 25.01 रुपये प्रति किमतीवर क्लोज झाले होते. ‘मर्क्युरी इव्ही टेक’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 417.34 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 27.57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

110 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली

‘मर्क्युरी इव्ही टेक’ कंपनीला नुकताच 2W EV निर्मात्यांकडून लिथियम-आयन बॅटरीच्या पुरवठ्यासाठी 110 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. भविष्यात ‘मर्क्युरी इव्ही टेक’ कंपनीच्या उद्योगासाठी ही ऑर्डर गेम चेंजर ठरू शकते. नुकताच ‘मर्क्युरी इव्ही टेक’ कंपनीने माहिती दिली की, त्यांना 3W पॅसेंजर आणि 3W लोडरसाठी L3 परवाना देण्यात आला आहे.

‘मर्क्युरी इव्ही टेक’ ही कंपनी आपली उपकंपनी PowerMetz Energy Private Limited च्या माध्यमातून 2W आणि 3W लिथियम आयन बॅटरीजचे उत्पादन करण्याचे काम करत आहे. ‘मर्क्युरी इव्ही टेक’ ही कंपनी भारतात नाविन्यपूर्ण आणि प्रगत इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्स विकसित करण्याचे प्रयत्न करत आहे. कंपनी 2W लो स्पीड, 2W हाय स्पीड, 3W लो स्पीड पॅसेंजर, 3W लो स्पीड लोडर, 3W हाय स्पीड पॅसेंजर, 3W हाय स्पीड लोडर, 4W हाय स्पीड लोडर, 12 सीटर ऑफ रोड बस आणि 56 सीटर बस यासह इलेक्ट्रिक वाहनांच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन करण्याचे काम करते.

मागील एका वर्षभरात या शेअरने 2,713.27 टक्के परतावा दिला

‘मर्क्युरी इव्ही टेक’ ही एक मल्टीबॅगर परतावा देणारी कंपनी आहे. मागील एका महिन्यात ‘मर्क्युरी इव्ही टेक’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 43.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 205.65 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2,713.27 टक्के परतावा कमावून दिला आहे. जून 2022 मध्ये या कंपनीचे शेअर्स फक्त 0.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 27.57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mercury EV Tech Share Price today on 09 June 2023.

हॅशटॅग्स

Mercury EV Tech Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x