22 May 2024 5:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 22 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
x

Advait Infratech Share Price | 3 वर्षात दिला 1100 टक्के परतावा, अद्वैत इन्फ्राटेक कंपनीच्या शेअरमध्ये तेजी, स्टॉकमध्ये खरेदी वाढली

Highlights:

  • Advait Infratech Share Price
  • 3 वर्षात दिला 1100 टक्के परतावा
  • कंपनीची आर्थिक कामगिरी
Advait Infratech Share Price

Advait Infratech Share Price | अद्वैत इन्फ्राटेक या स्मॉलकॅप कंपनीचे बाजार मूल्य 314.01 कोटी रुपये आहे. ही कंपनी 9 केबल्स आणि इलेक्ट्रिकल्स विभागात कार्यरत असून कंपनीने नुकताच ऑप्टिकल ग्राउंड वायर केबल टाकण्यासाठीची 30.27 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त केली आहे. या बातमीमुळे स्टॉकमध्ये अचानक खरेदी पाहायला मिळाली आहे.

गुरुवार 8 जून रोजी अद्वैत इन्फ्राटेक कंपनीचे शेअर्स 4.04 टक्के घसरणीसह 307.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.03 टक्के घसरणीसह 299.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

3 वर्षात दिला 1100 टक्के परतावा

मागील 3 वर्षात अद्वैत इन्फ्राटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. अद्वैत इन्फ्राटेक कंपनीने सेबी फाइलिंगमध्ये कळवले आहे की, कंपनीला 3,536 किमी लांबीच्या ऑप्टिकल ग्राउंड वायरच्या स्थापनेची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 30.27 कोटी रुपये असून याचा कालावधी 15 महिने आहे. अद्वैत इन्फ्राटेक कंपनीचे शेअर्स 1 ऑक्टोबर 2020 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. त्यावेळी शेअर्सची इश्यू किंमत 25.68 रुपये होती. आता हा स्टॉक 307.85 रुपयेवर पोहचला आहे. मागील 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत या स्टॉकने लोकांना 1,100 टक्के परतावा कमावून दिला आहे.

कंपनीची आर्थिक कामगिरी

जर तुम्ही 1 ऑक्टोबर 2020 रोजी अद्वैत इन्फ्राटेक शेअर्सवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1,100 टक्के वाढून 12 लाख रुपये झाले असते. अद्वैत इन्फ्राटेक कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात लोकांना 262.05 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 12.33 टक्के मजबूत झाले आहेत. तर अद्वैत इन्फ्राटेक कंपनीने आर्थिक वर्ष 2023 मध्ये 8.1 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. त्याच वेळी कंपनीने 104.4 कोटी रुपये महसूल संकलित केले आहे, जो मागील वर्षी 79.9 कोटी रुपये जमा झाला होता.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Advait Infratech Share Price today on 10 June 2023.

हॅशटॅग्स

Advait Infratech Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x